घरमुंबईहिंदुजा हेल्थकेअरमध्ये हृदयरोग रुग्णांसाठी ‘टीएव्हीआय’ सर्जरी

हिंदुजा हेल्थकेअरमध्ये हृदयरोग रुग्णांसाठी ‘टीएव्हीआय’ सर्जरी

Subscribe

वृद्ध रूग्णांमध्ये व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही जास्त जोखमीची असते, कारण, त्यासाठी ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. जे वय, इतर आजार आणि तत्पूर्वी केलेली बायपास शस्त्रक्रिया यामुळे सुचवली जात नाही.

हृदयरोग रुग्णांमध्ये अनेकदा वयोमानामुळे शस्त्रक्रियेची जास्त गुंतागुंत आणि धोका असतो. त्यामुळे टीएव्हीआय ही एरवी व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटसाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेऐवजी वापरली जाणारी पर्यायी शस्त्रक्रिया आहे. पण, सर्वच हॉस्पिटल्समध्ये ही सर्जरी उपलब्ध नसते. पण, आता हिंदुजा हेल्थकेअरमध्ये ही शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया

या प्रक्रियेमध्ये एका खास कॅथेटरच्या मदतीने नवा व्हॉल्व्ह बसवला जातो. जुना, खराब झालेला व्हॉल्व्ह न काढता आणि रूग्णाची छाती न उघडता ही प्रक्रिया केली जाते. वृद्ध रूग्णांमध्ये व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही जास्त जोखमीची असते, कारण, त्यासाठी ओपन हार्ट सर्जरी (हृदय खुली करून केली जाणारी शस्त्रक्रिया) करावी लागते, जे वय, इतर आजार आणि तत्पूर्वी केलेली बायपास शस्त्रक्रिया यामुळे सुचवली जात नाही. टीएव्हीआय ही कमीत कमी छेद देणारी प्रक्रिया असून ती एओर्टा स्टेनोसिस नावाने ओळखल्या जाणाऱ्या एओर्टा व्हॉल्व्हचे (झडप) अस्वाभाविक अरूंदीकरण झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी वापरली जाते.

- Advertisement -

हृदयातील झडपांमधील दोषांवर उपचार

हिंदुजा हेल्थकेयर सर्जिकल सल्लागार कार्डिओलॉजी डॉ. हरेश मेहता यांनी नुकतीच हॉस्पिटलमध्ये ८७ वर्षांच्या रूग्णावर ही प्रक्रिया केली. याविषयी डॉ. हरेश मेहता यांनी सांगितलं की, हृदयातील झडपांमधील दोषांवर उपचार करण्यासाठीचे हे उत्तम तंत्रज्ञान असून सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत ती अधिक चांगली आहे. ‘एओर्टा स्टेनोसिस (एओर्टा व्हॉल्व्हचे अस्वाभाविक अरूंदीकरण) हृदयाच्या स्नायूंवरील ताण आणि मानसिक तणाव वाढवते, अतीकाळजीत छातीत अस्वस्थता वाटणे, धाप लागणे, थकवा, डोकं हलकं वाटणं, बेशुद्ध पडणे आणि अचानक मृत्यू होणे अशी लक्षणे दिसू शकतात. जर यावर वेळीच उपचार केले गेले नाही, तर ५० टक्के रूग्णांना लक्षणे दिसल्यापासूनच्या एक- दोन वर्षांत मृत्यूचा धोका संभवतो.’

‘एओर्टा स्टेनोसिसमुळे भारतातील वृद्ध व्यक्तींवर लक्षणीय परिणाम झालेला आहे. उपचारांतील पोकळीमुळे भारतातील सुमारे ४.५ लाख रूग्णांवर उपचार केले गेलेले नाहीत. ही प्रक्रिया कमीत कमी छेद देणारी आणि एओर्टाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रूग्णांसाठी वरदान आहे,’ – डॉ. हरेश मेहता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -