घरमहाराष्ट्रछिंदमच्या निवडी विरोधात जिल्हा न्यायालयात याचिका

छिंदमच्या निवडी विरोधात जिल्हा न्यायालयात याचिका

Subscribe

श्रीपाद छिंदम च्या निवडीच्या विरोधात प्रभागातील पराभूत अपक्ष उमेदवाराने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून संपूर्ण राज्यातील जनतेचा रोष ओढवून घेतलेला व नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ९ मध्ये विजयी झालेल्या श्रीपाद छिंदम च्या निवडीच्या विरोधात प्रभागातील पराभूत अपक्ष उमेदवाराने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच प्रभागातील अन्य उमेदवार व मतदानाशी संबंधित प्रशासकीय अधिकारी अशा सुमारे १० जणांना या याचिकेच प्रतिवादी करण्यात आले आहे. महापालिकेच्या निवडणणुकीत मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे यांनी प्रभाग ९ क मधील जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढविली होती.

निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर 

या जागेसाठी एकूण १३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निलेश म्हसे यांनी छाननीच्या वेळी छिंदमच्या अर्जाबाबत आक्षेप घेतला होता. मात्र निवडणुक अधिकारी यांनी म्हसे यांची हरकत फेटाळून छिंदम चा अर्ज वैध असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर म्हसे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने निवडणुकप्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणुक कायद्यातील तरतुदींनुसार याचिका दाखल करण्याचे निर्देश म्हसे यांना दिले होते. त्यानुसार निलेश म्हसे यांनी संपूर्ण निवडणुक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छिंदम च्या निवडीला आव्हान देणारी याचिका जिल्हा न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत छिंदम सहीत अन्य ७ उमेदवार,निवडणुक निर्णय अधिकारी,मनपा आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.सदोष निवड प्रक्रियेतून छिंदम ची निवड झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. अॅड.सुहास टोणे म्हसे यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -