घरताज्या घडामोडीTemperature : राज्यातील या शहरांतील उकाड्यात प्रचंड वाढ; वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद

Temperature : राज्यातील या शहरांतील उकाड्यात प्रचंड वाढ; वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद

Subscribe

मागील काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील काही भागांत तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबई, ठाण्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली असून, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी मुंबईत 37.07 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

मुंबई : मागील काही दिवसांपासून सातत्याने राज्यातील काही भागांत तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबई, ठाण्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली असून, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारी मुंबईत 37.07 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच, पुढील दोन ते तीन दिवसात मुंबईत तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (temperature incensed in mumbai thane)

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी कुलाबा वेधशाळेत मुंबईतील कमाल तापमानाची 34.3 अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली होती. मुंबई पाठोपाठ ठाण्याचाही तापमानाच प्रचंड वाढ झाली आहे. ठाण्यातील कमाल तापमान 38.04 अंश सेल्सिअस होते. सर्वसाधारणपणे मुंबईतील कमाल तापमान मार्च महिन्यात 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास जाताना दिसत असते.

- Advertisement -

पुढील काही दिवस पूर्वेकडील प्रवाहामुळे मुंबईत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात सध्या गुजरातवर अँटीसायक्लोनची निर्मिती होत आहे. त्यामुळं पश्चिम ऐवजी पूर्व बाजूने वाऱ्यांचा वेग दिसत आहे. ज्यामुळे तापमानात वाढ दिसत असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 20 तासात विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच, 21 मार्चपासून पुणे परिसरात कमाल आणि किमान तापमानात 1-2 अंशानी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता वर्तवली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ARVIND KEJRIWAL : मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना अटक; दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -