घरमुंबईरिक्षा चालकांना ओएनजीसीच्या आगीची झळ

रिक्षा चालकांना ओएनजीसीच्या आगीची झळ

Subscribe

गॅस पुरवठा कमी दाबाने सुरू

उरण येथील ओएनजीसीच्या प्लांटला लागलेल्या भीषण आगीची झळ मुंबईच्या वाहतुकीला बसण्यास सुरुवात झाली आहे. मिरा रोड ते जोगेश्वरी दरम्यान सीएनजी केंद्र मंगळवारी दोन ते तीन तास बंद होते. त्यामुळे सीएनजीवर धावणार्‍या रिक्षा व्यवसायावर परिणाम पडला आहे. सोबतच या दुर्घटनेनंतर गॅस पुरवठा पाइपलाइनमधून कमी दाबाने गॅस पुरवठा होत असल्याने याचा फटका रिक्षा, टॅक्सी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांचे हाल होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

उरण येथील ओएनजीसी गॅस प्रक्रिया प्लान्टला लागलेल्या आगीमुळे मुंबईतील सीएनजी केंद्रांवर कमी दाबाने गॅस पुरवठा होत असल्याने टॅक्सी व रिक्षा चालकांना पुन्हा एकदा नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. याची सुरुवात सुद्धा झाली आहे. मंगळवारी मिरा रोड ते जोगेश्वरी दरम्यान सीएनजी स्टेशन दोन ते तीन तास बंद होते. त्यामुळे सीएनजी स्टेशन रिक्षांच्या रागांच्या राग लागल्या होत्या. महानगर कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेमुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनवरील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. तरी स्थानिक पीएनजी ग्राहकांचा पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कमी दाबाने पुरवठा होणार असल्याने ग्राहकांनी पर्यायी इंधनाची व्यवस्था करण्याचे आवाहनही कंपनीने केले आहे. या ओएनजीसीच्या प्रकल्पातूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबईला सीएनजी गॅस आणि एलपीजी पुरवठा होतो. शहारातील बहुतांश रिक्षा या सीएनजीवर धावत आहेत. ओएनजीसी प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे पुढचे काही दिवस सीएनजी आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे.

- Advertisement -

टाकी फुल्ल करण्यासाठी टॅक्सी चालकांची गर्दी
ओएनजीसीच्या प्लांटला लागलेल्या भीषण आगीमुळे रिक्षा, टॅक्सी चालकांना कमी दाबाने होणार्‍या गॅस पुरवठ्यामुळे आर्थिक फटका बसणार आहे. कमी दाबामुळे टॅक्सी चालकांना गॅससाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यात कंपनीने पुरवठा सुरळीत कधी होणार? याबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. मुंबई आणि परिसरातील अनेक सीएनजी केंद्रांवर गॅसची कमतरता जाणवू शकते, असेही कंपनीने म्हटल्याने केंद्रांवर टाकी फुल्ल करण्यासाठी टॅक्सी चालकांनी सायंकाळी पंपांवर गर्दी केली होती.

ओएनजीसी दुर्घटनेमुळे मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठ्यावर विपरित परिणाम जाणवणे सुरू झाले आहे. मिरा रोड ते जोगेश्वरी दरम्यान सीएनजी पंपावर दोन ते तीन तासासाठी बंद होते. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम पडत आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर पर्याप्त मार्ग काढावा.
– थम्पीं कुरियन,अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -