घरमुंबईअंबरनाथमधील पुरातन शीव मंदिरात ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

अंबरनाथमधील पुरातन शीव मंदिरात ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

Subscribe

शेवटच्या श्रावण सोमवाराचे औचित्य साधत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सपत्नी अंबरनाथमधील पुरातन शीव मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणीसुद्धा केली.

दुरवस्था झालेल्या अंबरनाथ येथील पुरातन शिवमंदिराची ठाणे जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज पाहणी केली. शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने ते पत्नीसह अंबरनाथ येथील पुरातन शिवमंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरात त्यांनी दर्शन घेऊन श्रावणमास हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सवा’च्या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी महोत्सवाचे आयोजक विजय चाहू पाटील व रवी चाहू पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचा सत्कार करून त्यांच्या हस्ते ‘श्रावणामास हिंदू धर्म महोत्सवा’च्या पुस्तकाचे लोकार्पण केले.

Thane collectors visit the ancient Shiva temple in Ambarnath
शीव मंदिरात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

मंदिराची पडझड पाहून खंत व्यक्त केली

गेल्या १५ वर्षापासून श्रावण महिन्यात शिवमंदिराच्या प्रांगणात पाटील बंधू करीत असलेल्या या मोहत्सवाबाबत जिल्हा अधिकारी राजेश नार्वेकर यांनी कौतुक केले. या शिवाय शिवमंदिराच्या झालेल्या दुरवस्थेबाबत विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्याशी चर्चा करून त्यांना मंदिरासह परिसर दाखवला. त्यावेळी नार्वेकर यांनी शिवमंदिराच्या झालेल्या दुरवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिरातील शिल्पांची पडझड पाहून खंत व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – कांदळवनातील ८ हजार टन कचऱ्याचे संकलन

मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत चर्चा करू

अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारी व नगराध्यक्षा मनिषा वाळेकर या देखील यावेळी उपस्थित होत्या. त्यांनीदेखील शिवमंदिराच्या दुरवस्थेबाबत व मंदिराच्या परिसराबाबत जिल्हाधिकारी यांना सांगितले. त्यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, ”या मंदिराच्या दुरवस्थेबाबत पुढच्या महिन्यात पुरातत्व विभागाचे अधिकारी, नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यासोबत बैठक घेऊन या मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत चर्चा करू. या शिवाय मंदिराच्या बाजूच्या परिसराचा अंबरनाथ नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने जो आराखडा तयार केला आहे, त्याबाबतही चर्चा करून मंदिराचा परिसर चांगला आणि सुंदर कसा होईल?”, याबाबत प्रयत्न करू असे राजेश नार्वेकर म्हणाले.

दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटले

”हे पुरातन मंदिर खूपच सुंदर आहे. अशी हेमडपंथी मंदिरं महाराष्ट्रात खूपच कमी आहेत. त्यातील हे एक प्रमुख आहे. मंदिराचा नमुना इतका सुंदर आहे की, या मंदिरामुळे ठाणे जिल्ह्याची ओळख झाली पाहिजे. मंदिरात दर्शन घेऊन खूपच प्रसन्न व आनंददायी वाटले,” असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -