घरमुंबईठाण्यात डबक्यात पडून लहानगा बुडाला

ठाण्यात डबक्यात पडून लहानगा बुडाला

Subscribe

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील किसननगर नं.३ येथील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनी शेजारी असलेल्या डबक्यात पडून एका सात वर्षाच्या लहानग्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. अनिकेत अंबादास गायकवाड (७) (रा. किसननगर नं. ३, जनता झोपडपट्टी) असे मुलाचे नाव असून तो खेळण्यासाठी जात असताना जलवाहिनीवरून थेट डबक्यात कोसळला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याठिकाणी जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खड्डा खोदण्यात आला असून खेळण्यासाठी जाताना अनिकेत घसरून डबक्यात पडला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपतकालीन पथकाने धाव घेऊन बचावकार्य केले.

- Advertisement -

कौटुंबिक भांडणात पतीचे पत्नी आणि मुलावर कोयत्याचे वार

दीपावलीच्या पूर्वसंध्येला कौटुंबिक भांडणात पतीने पत्नी आणि मुलावर मच्छी कापण्याच्या कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना ठाण्यातील बाळकूम पाडा नं. २ येथे घडली. प्रमोद पाटील (४३) असे हल्लेखोर पतीचे नाव असून या हल्यात पत्नी वैजयंती (३७) आणि मुलगा पृथ्वी (१३) हे दोघेजण जखमी झाले. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दीपावलीच्या पूर्वसंध्येला बाळकूम पाडा नं. २ येथे पाटील कुटुंबीय राहतात. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पती प्रमोद यांनी कौटुंबिक भांडणातून स्वयंपाक घरात काम करीत असलेल्या पत्नी वैजयंतीवर कोयत्याने हल्ला चढवला. यावेळी पृथ्वी हा मुलगा आईला वाचवण्याच्या प्रयत्नात जखमी झाला, अशी तक्रार प्रमोद यांचा दुसरा मुलगा राज (१६) याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -