घरमुंबईठाण्यातील भुयारी मार्ग : चोरी थांबली पण दुर्दशा सुरूच!

ठाण्यातील भुयारी मार्ग : चोरी थांबली पण दुर्दशा सुरूच!

Subscribe

एका ठिकाणी छप्परचा काही भाग तुटलेला असल्याने पावसाच्या पाण्याची होत असलेली गळती, स्पीकर आणि लाईटच्या चोरीला गेलेल्या वस्तू, अशी अवस्था ठाण्यातील नितीन कंपनीजवळ असलेल्या सब वे (भुयारी पादचारी मार्ग) ची दिसून येते. गेल्या दीड वर्षापासून सब वे मध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

एका ठिकाणी छप्परचा काही भाग तुटलेला असल्याने पावसाच्या पाण्याची होत असलेली गळती, स्पीकर आणि लाईटच्या चोरीला गेलेल्या वस्तू, अशी अवस्था ठाण्यातील नितीन कंपनीजवळ असलेल्या सब वे (भुयारी पादचारी मार्ग) ची दिसून येते. गेल्या दीड वर्षापासून सब वे मध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे चोरी आणि अनेक प्रकारांना आळा बसला असला, तरी सब वेच्या दुरावस्थेकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचेच दिसून येत आहे. महापालिकेने नितीन जंक्शनजवळील चौकात भुयारी पादचारी मार्ग बांधला आहे.

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी ३ मार्च २००७ मध्ये या पादचारी मार्गाचे भूमीपूजन केले होते. त्यानंतर चार वर्षांनी २०११ मध्ये तत्कालीन आमदार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले. या चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे हा सब वे पादचार्‍यांसाठी वरदानच ठरला. या सब वे ला एकूण आठ गेट आहेत. लुईसवाडी, चंदनवाडी, कोपर, ज्ञानेश्वर नगर, काजूवाडी, खोपट, पाचपाखाडी, तीन हात नाका, दर्यासागर हॉटेल, फायर ब्रिगेड परिसर महापालिका मुख्यालय, पासपोर्ट ऑफीस, कामगार हॉस्पीटल, कोरम मॉल आदी परिसरातील नागरिक या सब वेचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. साधारण दररोज पाच ते सात हजार पादचारी या सब वेचा वापर करतात. तसेच या परिसरात तीन शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग महत्वाचा ठरला आहे.

- Advertisement -

सब वे बांधण्यात आला त्यावेळी त्या ठिकाणी स्पीकर स्पॉट लाईट, ट्यूब लाईट लावण्यात आली होती. तसेच स्पीकरमधून जुनी गाणीही लावली जात होती. मात्र काही महिन्यानंतर इथले स्पीकर, स्पॉट लाईट चोरीला गेले. तसेच सब वे मध्ये गैरप्रकारही सुरू झाले. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी पालिकेने २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. गेल्या दीड वर्षापासून या ठिकाणी सहा सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. एका शिफ्टमध्ये तीन असे दोन शिप्टमध्ये सहा सुरक्षा रक्षक तैनात असतात. सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीनंतर इथल्या अनेक गैरप्रकारांना आळा बसला आहे. नागरिक महिला आणि मुलींनाही सुरक्षित वाटत आहे. मात्र चोरीला गेलेल्या वस्तूच्या जागा तशाच दिसून येतात. गेल्या अनेक दिवसांपासून सब वे मधील ट्यूब लाईटही बंद होती मात्र दोन दिवसांपासून विद्युत विभागाने बदलून नव्या ट्यूब लाईट्स लावल्या आहेत. असे तिथल्या नागरिकांनी सांगितले. सुरक्षा मंडळाकडील सुरक्षारक्षक आहे. सुरक्षा रक्षकांचा गणवेश निळ्या रंगाचा आहे. त्यांना खाकी गणवेश देण्यात यावा असा प्रस्ताव पालिकेच्या सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा मंडळाकडे मांडला होता. मात्र अजून त्यांच्या प्रस्तावावर सुरक्षा रक्षक मंडळाने विचार केलेला नाही. खाकी गणवेशामुळे नागरिकांना एक दबाव निर्माण होतो असे पालिकेच्या सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे. सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत हा सबवे सुरू असतो. मात्र रात्री दहा नंतर हा सब वे बंद करण्यात येतो.

महापालिकेकडून चांगल्या सोयी सुविधा पुरविल्या जातात. पण वस्तू चोरीला जातात. ज्या ठिकाणी सबवेची दुरावस्था झाली आहे. त्या ठिकाणी तांत्रिक दृष्ठ्या तपासणीचे काम करण्यात येईल. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे. तिथले काम करण्यात येईल.
-अनिल पाटील, नगर अभियंता, ठामपा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -