घरमुंबईआरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Subscribe

महापौर धमकी प्रकरण, गुगलवरून शोधला आरोपीने नंबर

ठाणे महापालिका महापौरांना फोनवर दाऊदचा हस्तक असल्याची बतावणी करून धमकावणारा आरोपी वसिम सादिक मुल्ला याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे. त्याच्या सखोल चौकशीत तो विक्षिप्त असून त्याचा दाऊद किंवा त्याच्या टोळीशी कुठलाही संबंध नसल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी दिली.

17 सप्टेंबर रोजी दाऊदचा हस्तक बोलतोय म्हणून ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांना फोनवरून धमकावण्यात आले. मात्र धमकावणार्‍याला महापौर शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर खंडणी विरोधी पथकाने मोबाईल नंबरवरून आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने आरोपीची कसून चौकशी केली. त्याच्या सिम कार्डची आणि त्यामधील संभाषणाची तपासणी केल्यानंतर हा भामटा असल्याचे समोर आले. आरोपी वासिम सादिक मुल्ला हा विक्षिप्त प्रवृत्तीचा असून त्याचा दाऊदशी किंवा त्याच्या टोळीशी कुठलंही संबंध नाही. त्याने फोननंबर हा गुगलवरून शोधून काढला होता. दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत चौकशीनंतर खंडणी विरोधी पथकाने त्याला कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर त्याला सोमवारी न्यायालयात नेले असता आरोपी मुल्ला याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -