घरमुंबईकुपोषित बालकांच्या आहारात केंद्र सरकारकडून कपात

कुपोषित बालकांच्या आहारात केंद्र सरकारकडून कपात

Subscribe

बालकल्याण सचिवांची कबुली

केंद्र सरकारकडून अन्न पुरवठा कमी होत असल्यामुळे कुपोषित बालकांना पुरवण्यात येणार्‍या आहारात कपात करण्यात आल्याची कबुली बालकल्याण विभागाच्या सचिवांनी दिली आहे.त्यामुळे पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.पालघर जिल्ह्यातील सहाशेहून अधिक कुपोषित बालकांचा मृत्यू झालेला असतानाही दुर्गम भागातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहारात कपात करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अंगणवाड्यांना अन्न पुरवठा कमी झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

महिला बचत गटामार्फत पोषण आहार पुरवण्यात येत होता.त्यात जुलै 2017 पासून 60 ते 80 टक्के कपात करण्यात आली होती. ही बाब श्रमजीवी संघटनेच्या निदर्शनास आल्यावर संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, समर्थनचे प्रतिनिधी रुपेश कीर आणि स्नेहा घरत यांनी मंत्रालयाला धडक दिली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगरानी यांची भेट घेऊन पोषण आहार कपातीची गंभीर बाब कथन केली.

- Advertisement -

गगरानी यांनीही या प्रकाराचे गांभीर्य ओळखून ताबडतोब महिला आणि बालकल्याण विभागाच्या सचिव विनीता सिंघल यांना बोलवून विचारणा केली. त्यावेळी पालघर,नंदुरबार,गडचिरोली, अमरावती,मेळघाट परिसरातील पोषण आहारात कपात करण्यात आल्याचे त्यांनी मान्य केले. केंद्र शासनाकडून अन्नपुरवठा कमी झाल्यामुळे कपात झाल्याचे यावेळी सिंघल यांनी स्पष्ट केले. त्यानंतर यापुढे केंद्राने कपात केली तरी महिला बाल विकास विभागामार्फत ती कपात भरून काढण्यात येईल,असे आश्वासनही त्यांनी दिले.त्यादृष्टीने सिंघल यांनी संबंधित अधिकार्‍यांना ताबडतोब तसे आदेश दिले. पोषण आहारातील कपात टळल्यामुळे आता कुपोषित बालकांना गरम ताजा आहार मिळणार असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -