घरमुंबईसीमांकन निश्चित केल्याशिवाय क्लस्टर येऊ देणार नाही

सीमांकन निश्चित केल्याशिवाय क्लस्टर येऊ देणार नाही

Subscribe

आ. जितेंद्र आव्हाड यांचा आगरी- कोळी बांधवांसाठी लढण्याचा निर्धार

सिमांकन झाल्याशिवाय क्लस्टर येऊ देणार नाही. पण, शिवसेना सत्ता सत्ताधारी आहे. त्यामुळे शिवसेनेने ही भूमिका नाकारली तर घात होऊ शकतो. म्हणून येथे उपस्थित असलेल्या आगरी- कोळी नेत्यांनी शिवसेनेवर दबाव आणावा. तुम्ही जेव्हा बोलवाल तेव्हा मी उपस्थित राहेन आणि तुमचे नेतृत्व स्वीकारुन लढ्यात सहभागी होईन, असे आश्वासन देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आगरी-कोळी समाजाच्या लढ्यात सक्रीय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेच्यावतीने भूमिपुत्रांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा दिला. यावेळी आव्हाड यांनी सांगितले की, सीमांकनाचा लढा दशरथ पाटील यांनी केली. प्रॉपर्टी कार्डवर नावे येण्यासाठी जो दबाव टाकण्यात आला आहे. त्यामागे दशरथ पाटील यांचे योगदान मोठे आहे. क्लस्टरची योजना आल्यानंतर त्यांनी आपणाला भूमिका घ्यावी लागेल, असे सांगितले. जरी ते सेनेचे असले तरी शरद पवारांना मानणारे असल्याने आमचे नाते जवळचे आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रसने आधी सीमांकन आणि नंतर क्लस्टर अशी भूमिका घेतली आहे. जोपर्यंत गावठाणांचे सीमांकन केले जात नाही तोपर्यंत क्लस्टरला मंजुरी देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादीने ठामपाकडे केली आहे.

- Advertisement -

शिळ-दिवा- म्हातार्डीमध्ये बुलेट ट्रेनसाठी सर्व्हे होणार होता. तेथील सर्व्हे आम्हीच उठवून लावला आहे. आज त्याच जमिनीवर आरक्षण आणले जात आहे. ते आरक्षण आमचे नगरसेवक उधळून लावतील. म्हातार्डीला स्टेशन आल्यावर मेट्रो आणायला लागेल. अहमदाबादच्या माणसासाठी आम्हाला बुलेट ट्रेन नकोय. जमीन उद्ध्वस्त करणारे आणि गोरगरीबांना भिकेला लावणारे धोरण आहे. 1 लाख 50 हजार कोटींची उधळपट्टी करुन बुलेट ट्रेन आणायची आहे. त्यापेक्षा रेल्वेसेवा चांगली करा, असे सांगून आगरी -कोळी बांधवांचे नेतृत्व त्यांच्यातीलच एकाने करावे. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करण्यास तयार आहोत, असे आश्वासन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -