घरमुंबईनव्या नियमानुसार डीटीएचधारकांना KYC बंधनकारक

नव्या नियमानुसार डीटीएचधारकांना KYC बंधनकारक

Subscribe

सर्व सबस्क्रायबर्सना केवायसी बंधनकारक असणार आहे. केवायसीची प्रक्रिया सोपी आहे, असे आदेश ट्रायने दिले आहेत.

दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय)ने डीटीएच आणि केबलधारकांना चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य दिले. असे असूनही ग्राहकांना कंपन्यांच्या मनमानी कारभाराच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत असल्याची तक्रार ग्राहकांकडून होत आहे. त्यातच आता ट्रायने नवीन नियमांची यादी जारी केली आहे. त्यानुसार डीटीएच धारकांना आता केवायसी (KYC) करणं बंधनकारक असणार आहे. सर्व सबस्क्रायबर्सना केवायसी बंधनकारक असणार आहे. केवायसीची प्रक्रिया सोपी आहे, असे आदेश ट्रायने दिले आहेत.

ट्रायचा नवा नियम

ट्रायने जारी केलेल्या नव्या नियमानुसार सध्याचे ग्राहक आणि नवीन डीटीएच सबस्क्रायबर्स यांना हा नवा नियम लागू असेल. त्यानुसार सध्याच्या ग्राहकांना केवासीसाठी दोन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. तर नव्याने कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना आधीच केवासी करावे लागणार नाही. त्यानंतरच नवीन डीटीएच कनेक्शन सोबत मिळणारा सेट टॉप बॉक्स इन्स्टॉल करण्यात येईल. नव्या नियमानुसार ज्या ठिकाणी सेट टॉप बॉक्स लावायचा आहे तिथलाच पत्ता कनेक्शनच्या अर्जावर असणे आवश्यक आहे. ग्राहकांची ओळख पटावी म्हणून केबल ऑपरेटरच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड पाठवण्यात येईल. त्यानंतर सेट टॉप बॉक्सच्या इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल. असे ट्रायच्या नव्या नियमात म्हटले आहे. मोबाईल नसणाऱ्या ग्राहकांना केबल ऑपरेटर्सना ओळखपत्र द्यावं लागणार आहे. ज्या ग्राहकांचा मोबाईल नंबर डीटीएचला लिंक नाही त्यांना २ वर्षात ते करुन घ्यावं लागणार आहे. केबल ऑपरेटर्सना ग्राहकांच्या पडताळणीची कागदपत्रे गोळा करण्याची परवानगी आहे. पण ट्राय सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या ठिकाणाची माहिती गोळा करता येणार नाही.

- Advertisement -

डीटीएच धारकांना खूशखबर

एसएमएसच्या माध्यमातून चॅनल जोडण्याची किंवा हटवण्याची सुविधा देण्यात यावी, असे आदेश दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म्स ऑपरेटर्सना (डीपीओ) दिले आहेत. त्यानुसार डीटीएचधारकांना आता टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून आता चॅनल घेता येणार आहे किंवा हटवता येणार आहे. ९९९ क्रमांकावर सर्व चॅनल्सची यादी एमआरपीसह उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेशही ट्रायनं सर्व डीपीओंना दिले आहेत. ही सुविधा दिल्यानं डीटीएचधारकांना आपल्या पसंतीचे चॅनल निवडता येणार आहेत. तसंच प्रत्येक चॅनलसाठी आपण किती पैसे मोजणार आहोत याचीही माहिती मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -