घरमुंबईअध्ययन निष्पत्ती परीक्षेत पालिका नापास

अध्ययन निष्पत्ती परीक्षेत पालिका नापास

Subscribe

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात कामगिरी सुधारण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या अध्ययन निष्पत्ती परीक्षेच्या नियोजनात शिक्षण विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. फळ्यावर प्रश्नपत्रिका देण्यापासून ते उत्तरपत्रिका तपासण्यापर्यंत शिक्षकांना सोमवारी तारेवरची कसरत करावी लागली, अशी माहिती अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. तर अनेक शाळांमध्ये सोमवारी प्रश्नपत्रिकादेखील उशिराने पोहचल्याची माहिती मुख्याध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाद्वारे (एनएएस) 2017-18 मध्ये झालेल्या अध्ययन निष्पत्तीच्या सर्वेक्षणात देशात महाराष्ट्रात तर राज्यात मुंबई महापालिका अनुत्तीर्ण झाली आहे. अध्ययन निष्पत्तीच्या मूल्यमापनात जिल्हानिहाय निकालात मुंबई उपनगर जिल्हा सर्वात शेवटी आहे. मुंबई शहर जिल्ह्याची कामगिरीही अतिशय चिंताजनक बाब नुकतेच सर्वेक्षणातून पुढे आली होती. या परीक्षेसंदर्भातील प्रथम वृत्त ‘आपलं महानगर’ने आपल्या ७ ऑक्टोबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. एकाच दिवशी चार विषयांच्या परीक्षा घेण्याचे हे आव्हान पालिका कितपत पेलू शकते, याबाबत अनेकांनी साशंकता व्यक्त केली होती. ती अखेर सोमवारी खरी ठरली.

- Advertisement -

मुंबईतील हा दर्जा सुधारण्यासाठी एनएएसच्या धर्तीवर सराव शाळांमध्ये परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते दहावीसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली ही परीक्षा ज्ञान, आकलन, उपयोजना, पृथक्करण, संश्लेषण या उद्दिष्टांवर आधारित आहे. ही चाचणी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला शाळांमध्ये होणार आहेत. या चाचणीसाठी विषयनिहाय, इयत्तानिहाय, माध्यमनिहाय अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपत्रिका तयार करणे याची जबाबदारी माध्यमनिहाय नोडल अधिकार्‍यांवर दिली आहे. परंतु, एकाच दिवशी सर्व विषयाच्या सराव परीक्षा होणार असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी त्या प्रचंड तणावाच्या ठरणार आहेत. तसेच परीक्षा नियोजनरहित असल्याने शिक्षकांच्या मनातही असंतोष असल्याने या चाचण्यांच्या निकालाबाबत महापालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी शंका उपस्थित केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -