घरमुंबईठाण्यातील अत्याधुनिक स्मशानभूमीचे उद्या लोकार्पण

ठाण्यातील अत्याधुनिक स्मशानभूमीचे उद्या लोकार्पण

Subscribe

ठाणे महानगरपालिकेच्या नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत जवाहरबाग येथील जुन्या स्मशानभूमीच्या बाजूला नवीन अत्याधुनिक स्मशानभूमीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महापालिका आयुक्तांच्या संकल्पनेतून वास्तुविशारद प्रविण जाधव आणि महापालिका यांनी संयुक्तपणे या स्मशानभूमीचे डिझाईन तयार करण्यात येत असलेली ही अत्याधुनिक स्मशानभूमी येत्या 26 जानेवारी रोजी कार्यान्वित होणार आहे. स्मशानभूमीच्या समोरील राघोबा शंकर रोडवरील बांधकाम करणे व त्यामध्ये बाधित होणार्‍या 27 कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटल्याने आता स्मशानभूमीतील सर्व अडसर दूर झाले आहेत. मागील आठवड्यात ठामपा आयुक्तांनी यासंबंधी पाहणी करून स्मशानभूमी लोकार्पण करण्याचे निर्देश दिले होते.

ठाण्याची लोकसंख्या 5 हजारांहून 25 लाखांपर्यंत पोहोचली असताना या स्मशानभूमीचे ठाण्याला फार मोठे महत्त्व आहे. गेल्या 100 वर्षांत या मुख्य स्मशानभूमीचे सुमारे कित्येकवेळा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण झाले. विद्युतदाहिनीचा पहिला प्रयोगदेखील 15 वर्षांपूर्वी याच स्मशानात यशस्वी झाला होता.

- Advertisement -

लाकडांचा वापर होणार कमी
भविष्याचा वेध घेऊन स्मार्ट मशिनरीसह पारंपरिक अग्निक्रिया लक्षात घेऊन प्रमुख 6 मशिन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एक ट्रॉली लाकडावरचे पार्थिव घेऊन मशीनमध्ये जाईल. धूर, उष्णता, विस्तवाचे कण या सर्व गोष्टी शोषून ते आउटलेट चिमणीद्वारे वातावरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे शेजारच्या वसाहतीला होत असलेला उष्णता, वास, धूर आणि प्रदूषणाचा त्रास थांबेल. एक मृतदेह दहन करण्यास किमान 200 ते 250 किलो लाकूड जाळावे लागते. त्याचे प्रमाण 30 ते 35 किलोवर येईल.

15 वर्षांपूर्वी विद्युतदाहिनी बसवतानाही काही जणांनी त्याला नाके मुरडली होती. त्यामुळे भविष्याचा वेध घेऊन या स्मार्ट मशिनरी बनवण्यात आल्या आहेत. या सर्व मशीनला गॅसमध्ये कन्व्हर्ट केलेले आहे. ज्यांना लाकूड नको, त्यांना हा दुसरा इकोफ्रेण्डली पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. स्मशानभूमीच्या आधुनिकीकरणाकरिता सुमारे 5 कोटी रुपये निधी इंद्रधनुष्य (सहीयारा) या सेवाभावी संस्थेने उपलब्ध करून दिला. त्यामुळेच आज ही स्मशानभूमी आधुनिक पद्धतीने उभी राहिली असल्याचे मत ठाणेकरांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

आधूनिक स्मशानभूमीसोबतच समोरील फुटपाथची दुरुस्ती करणे. स्शानभूमीजवळील शौचालयाची रंगरंगोटी करणे तसेच महानगर गॅसची पाईपलाईन टाकणे, स्मशानभूमीच्या चौकामध्ये हाय मास्ट बसविणे, तसेच आवश्यक तेवढ्या गॅस सिलिंडरची व्यवस्था करणे, स्मशानभूमीच्या आवारात आकर्षक लँडस्केपिंग करणे, आवारात विद्युत व्यवस्था करणे, ध्वनिक्षेपन यंत्रणा लावणे तसेच स्मशानभूमीच्या आवारात माहितीचे फलक लावणे. इत्यादी कामे ठामपाच्या वतीने करण्यात आली आहेत. ज्याचा नागरिकांना नक्कीच फायदा होईल.
– मारुती गायकवाड, सहाय्यक आयुक्त, ठामपा नौपाडा-कोपरी प्रभाग समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -