घरमुंबई‘त्या’ एलआयसी अधिकार्‍याच्या बेपत्ता होण्यामागे पिंटु शर्माचाच हात?

‘त्या’ एलआयसी अधिकार्‍याच्या बेपत्ता होण्यामागे पिंटु शर्माचाच हात?

Subscribe

विरार आणि नायगाव प्रकरणात साम्य

मित्राच्या प्रेताचे शेकडो तुकडे करून ते संडास आणि बाथरूममध्ये फ्लश करणार्‍या आरोपी पिंटु शर्मानेच बोरिवलीतील एलआयसी अधिकार्‍याचा घात केल्याचा आरोप आता करण्यात येत आहे. तशी माहितीही पोलिसांना देण्यात आली आहे.
विरारच्या ग्लोबल सिटी-बचराज पॅरेडाईजमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन पिंटु शर्माने गणेश कोलटकर यांचा घात केला. त्यानंतर त्यांच्या अवयवाचे शेकडो तुकडे करून पिंटुने ते संडास-बाथरूम आणि नाल्यात टाकले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पिंटुला ताब्यात घेऊन मांसाचे तुकडे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी न्यायालयानेही 30 तारखेपर्यंत पिंटुला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनीही मृत्यू झालेल्या गणेशच्या बहिणीला बोलावून तिच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. त्यावरून सापडलेल्या मांसाची डिएनए टेस्ट करण्यात येणार आहे.

दरम्यान,21 फेब्रुवारी 2018 पासून बेपत्ता असलेल्या बोरिवलीतील एलआयसी अधिकारी अरविंद रानडे यांचाही आरोपी पिंटु शर्मानेच घात केल्याचा आरोप रानडे यांचे मामेभाऊ श्रीनिवास पटवर्धन यांनी केला आहे. रानडे बेपत्ता होण्यापूर्वी महिनाभरापासून पिंटु शर्मा त्यांच्याकडे एजंट म्हणून कार्यरत होता. 21 फेब्रुवारीला रानडे यांच्यासोबत पिंटु शर्मा नायगावच्या परेरा नगरातील फ्लॅटमध्ये गेला होता. हा फ्लॅट पिंटुनेच भाडेतत्वावर घेतला होता. याच फ्लॅटमधून रानडे बेपत्ता झाले होते. रानडे यांची वृद्ध आई आणि मामेभाऊ पटवर्धन यांच्या तक्रारीवरून पिंटू शर्माला वालीव पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. त्यानंतर चौकशी करून त्याला सोडले होते.

- Advertisement -

विरारमध्ये खून झालेले गणेश कोलटकर आणि नायगावातून बेपत्ता झालेले रानडे हे दोघेही अविवाहित आणि 58 वर्षांचे होते. तसेच, रानडे यांची आई 85 वर्षांची आणि विविध आजाराने ग्रासली आहे. तर, कोलटकर यांचे आई-वडीलही आजाराने अंथरुणाला खिळलेले आहेत. पिंटुने रानडेंच्या वेळी नायगावला तर कोलटकर यांच्यावेळी विरारला फ्लॅट भाड्याने घेतला होता. असे या दोन्ही घटनेत साम्य आहे. त्यामुळे रानडेंचा पिंटुनेच घातपात केल्याचा आरोप पटवर्धन यांनी केला आहे. तसेच, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -