घरमुंबईमेट्रो-३ मार्गातला पहिला ब्रेकथ्रू

मेट्रो-३ मार्गातला पहिला ब्रेकथ्रू

Subscribe

राष्ट्रध्वज फडकावून साजरा केला जल्लोष

मुंबई : कुलाबा-वांद्रे- सीप्झ या भूयारी मुंबई मेट्रो प्रकल्पात महत्वाचा मानल्या जाणाऱा टनेर बोअरिंग मशीनच्या माध्यमातून पहिला ब्रेकथ्रू आज पार पडला. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सायंकाळी 5.31 सुमारास टनेल बोरिंग मशीनने वेग घेतला. अवघ्या एक मिनिटाहून कमी कालावधीत टनेलमधून पाण्याचे फवारे बाहेर पडले. बघता बघता गेले काही तास तग धरून राहिलेल्या काळ्या बसाल्टला मशीनने वाट मोकळी करून दिली. अन् मेट्रो ३ प्रकल्पातला पहिला ब्रेकथ्रू पार पडला. मरोळ व्हिलेज ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान १२६० मीटर अंतर कापल्यानंतरचा हा पहिलाच ब्रेकथ्रू. विशेष म्हणजे कामगारांनी टीबीएम मशीनमधून भारताचा झेंडा फडकावला आणि एकच जल्लोष झाला. चांगल्या कामात मिळालेला ब्रेकथ्रू अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या या कामाचे कौतुक या प्रसंगी केले.

मुंबईतली उपनगरीय लोकल, बेस्ट वाहतूक सेवा, ट्रान्स हार्बर लिंक, वांद्रे वर्सोवा कनेक्टिव्हिटी, एअरपोर्ट, कोस्टल कनेक्टिव्हिटी या सगळ्या ठिकाणासाठी प्रकल्प येऊ घातले आहेत. या प्रकल्पांसाठी वाहतूक सेवांची एकच कनेक्टिव्हिटी करण्याचा सरकारचा मानस आहे. एमएमआरडी या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी आहे. देशात अशाच स्वरूपाचा इंटिग्रेटेड तिकीटींग सिस्टिमचा प्रकल्प राबवण्यासाठी नीती आयोगामार्फत मुंबईच्या या प्रकल्पाचा अभ्यास झाला आहे. अनेकदा हे प्रकल्प कागदावरच राहतील अशी उलट सुलट चर्चा होती. मात्र हे प्रकल्प प्रत्यक्षात येत असून मुंबईच्या वाहतुकीचा चेहरा येत्या दोन ते तीन वर्षात बदलून टाकतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

आजचा ब्रेकथ्रू ही भारतातील मेट्रोच्या कामातली पहिली महत्वाची सुरूवात आहे. आणखी असाच अवघड पल्ला पार करायचा आहे. मुंबई मेट्रो ही सर्वात लांबीची असणार आहे, तसेच मुंबईकरांच्या प्रवासासाठी ही वरदान ठरेल. भुयारी मेट्रोला एलिव्हेटेड मेट्रोचे इंटिग्रेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोच्या माध्यमातून एकप्रकारे रिंग रूट तयार करण्याचा प्रयत्न असेल. भूयारी मेट्रोच्या मार्गात अनेक अडथळे येत आहे. पण या अडथळ्यातून मार्ग काढत मेट्रोच काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी काम करणार्‍या मेट्रो ३ च्या टीमचे कौतुक आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -