घरमुंबईमोलकरणीने साडेआठ लाख चोरून नवर्‍याला दिली गाडी

मोलकरणीने साडेआठ लाख चोरून नवर्‍याला दिली गाडी

Subscribe

माटुंगा परिसरात राहणार्‍या निलिमा नगरकर यांच्या खात्यातून चोरीला गेलेले साडेआठ लाख रुपये माटुंगा पोलिसांनी परत मिळवून दिले

माटुंगा परिसरात राहणार्‍या निलिमा नगरकर यांच्या खात्यातून चोरीला गेलेले साडेआठ लाख रुपये माटुंगा पोलिसांनी परत मिळवून दिले. निलिमा नगरकर यांच्या मोलकरणीनेच त्यांच्या एटीएमच्या सहाय्याने हे पैसे टप्याटप्प्याने काढले होते. छाया जाधव (३१) असे या आरोपी मोलकरणीचे नाव आहे.नगरकर यांचा मुलगा नोकरीनिमित्ताने अमेरिकेला वास्तव्याला आहे. दर महिन्याला तो नगरकर यांच्यासाठी पैसे पाठवायचा, परंतू नगरकर यांना ते एटीएममधून काढता येत नसल्यामुळे आपल्या मोलकरणीला पैसे काढून आणायला सांगत. या गोष्टीचा फायदा घेत आतापर्यंत मोलकरणीने वरचेवर पैसे काढून बराच गल्ला जमवला होता.

विषेश म्हणजे तिने आपल्या रिकामटेकड्या नवर्‍यासाठी एक चारचाकी वॅगनार गाडीसुद्धा गिफ्ट केली होती.  निलिमा नगरकर यांना संशय येताच त्यांनी बँकेत चौकशी केली, मात्र खात्यातील रक्कम गायब झाल्याची माहिती त्यांना मिळाली. माटुंगा पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोणकोणत्या एटीएममधून या खात्यातील पैसे काढण्यात आले त्याची माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेज आणि बँकेचे डिटेल्स याच्या आधारे तपास केला असता छाया जाधवनेेच पैसे काढल्याचे समोर आले. पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेतल्यानंतर तिने आपला गुन्हा कबूल केला. तिच्याकडून रोख रक्कम ४ लाख रुपये जप्त करण्यात आले. उर्वरीत रकमेची वॅगनॉर गाडी घेऊन तिने नवर्‍याला गिफ्ट केल्याचे तिने सांगितले.  माटुंगा पोलिसांनी ही रक्कम आणि वॅगनॉर गाडी (MH 01 CR 8023) निलिमा नगरकर यांना सोपवली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा तपास माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि टीमने केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -