घरमुंबईदहशतीची धाकधुक कायम

दहशतीची धाकधुक कायम

Subscribe

26/11 दहशवादी हल्ल्यामध्ये मुंबईचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्याचे व्रण मुंबईकरांच्या मनावर इतके खोलवर रुजले आहेत की, त्या ठिकाणांवर आजही 10 वर्षांनंतर गेल्यावर त्या दहशतीची आठवण होते. दहशतवादी हल्ला झालेल्या त्या ठिकाणांच्या सध्याच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा…

बधवार पार्क
26/11 च्या हल्ल्यात जिवंत पकडलेला दहशतवादी मोहम्मद अजमल आमीर कसाब व त्याचे आठ साथीदारांनी याच ठिकाणाहून मुंबईत प्रवेश केला. कुबेर या बोटीने ते मुंबईच्या किनार्‍यावर दाखल झाले. परंतु त्यापूर्वी बोटीवरील तांडेल व त्यांच्या तीन सहकार्‍यांची त्यांनी हत्या केली. 26/11 च्या हल्ल्याची भीषणता पाहता बधवार पार्कजवळच आता पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. 10 वर्षांपासून इथे कडेकोट बंदोबस्त असतो. या ठिकाणी कोण येतो, कोण जातो, याची पोलिसांकडून शहानिशा करण्यात येते.

- Advertisement -

नरिमन हाऊस, (छाबड सेंटर)
कुलाबा परिसरात असणारी ही आलिशान इमारत आहे. या इमारतीमध्ये परदेशी नागरिक वास्तव्याला असतात. त्यामुळे या इमारतीमध्ये राहणार्‍या परदेशी नागरिकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या इमारतीमध्ये राहणार्‍या अनेक परदेशी नागरिकांवर दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला होता. यात अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या खुणा आजही येथील भिंतीवर आहेत. या खुणा लाल रंगाच्या गोलाकार वर्तुळांनी अधोरेखित केलेल्या आहेत. 10 वर्षानंतरही या घटनेच्या कटू आठवणी जाग्या करणार्‍या या निशाणी येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाला त्या घटनेची आठवण करून देतात.

ताज हॉटेल
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलपैकी ‘ताज हॉटेल’ हे एक आहे. 26/11 ला दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर निशाणा साधला होता. अंधाधुंद गोळीबार करत अनेकांना मृत्यूच्या दारात लोटण्यात आले. सलग दोन दिवस दहशतवादी या हॉटेलमध्ये ठाण मांडून बसले होते. हॉटेलमध्ये अडकलेले प्रवासी, कर्मचारी यांना वाचवण्यासाठी पोलिस, एनएसजी कमांडो, विशेष सुरक्षा दलाने आपल्या प्राणाची बाजी लावली होती. दहशतवादी हल्ल्यात या हॉटेलचे मोठे नुकसान झाले; पण ते सगळं पूर्वरत करण्यात आले. हल्ल्यानंतर हॉटेलमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हॉटेल परिसरात गाडी उभी करायची असेल तरी रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्या काळारात्रीच्या कटू आठवणींचे स्मरण करत प्रत्यक्ष साक्षीदार असलेली ही इमारत आजही मोठ्या दिमाखात उभी आहे.

- Advertisement -

लिओपोर्ल्ड कॅफे
कुलाबासारख्या भरवस्तीत अगदी मुख्य रस्त्यालगत उभा असणारा हा कॅफे दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा शिकार झाला. हल्ल्यावेळी झालेल्या गोळीबारात परदेशी नागरिकसुद्धा मृत झाले. जवळपास 1971 मध्ये उभारण्यात आलेल्या हा कॅफे अजूनही उभा आहे. मध्यंतरी मुंबई महापालिकेने अतिक्रमाची कारवाई करत त्या ठिकाणी असणारे बेकायदा बांधकाम पाडले आहे. पण हा कॅफे मात्र सुरू आहे.

तुकाराम ओंबळे स्मारक (गिरगाव चौपाटी)
सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुकाराम आेंबळे यांनी मोठ्या धाडसाने कसाबवर झडप घालून त्याला जिवंत पकडले. यावेळी कसाबसोबत झालेल्या झटापटीत कसाबने झाडलेल्या गोळीने आेंबळेचा बळी घेतला. परंतु अखेरच्या श्वासापर्यंत आेंबळे यांनी कसाबला घट्ट पकडून ठेवल्याने प्रथमच दहशतवादी जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आले. ज्या ठिकाणी आेंबळे यांनी कसाबला पकडले, त्या गिरगाव चौपाटीजवळ तुकाराम आेंबळे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकाची कायम स्वच्छता असते. योग्य ती निगा राखली जाते. गिरगाव चौपाटी पोलीस चौकीचे अधिकारी, कर्मचारी दरवर्षी त्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -