घरमुंबईकोकण रेल्वे आता लवकरच विजेवर धावणार

कोकण रेल्वे आता लवकरच विजेवर धावणार

Subscribe

येत्या काळाता कोकण रेल्वे पुर्णपणे विजेवर धावणार आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चाचणीही पूर्ण झाल्याची माहिती मिळते.

येत्या काळाता कोकण रेल्वे पुर्णपणे विजेवर धावणार आहे. कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चाचणीही पूर्ण झाल्याची माहिती मिळते. शिवाय, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या प्रकल्पाचे अधिकृतपणे लोकार्पण होणार असल्याची माहिती मिळते.

कोकण रेल्वे आता पूर्णपणे विजेवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. विजेवर प्रवासी रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिझेलची बचत होणार आहे. तसेच प्रवाशांना प्रदूषणमुक्त वातावरणात रेल्वे प्रवास करणे शक्य होणार आहे. दरम्यान, १२ डब्यांच्या रेल्वेगाडीच्या एका किलोमीटरसाठी साधारणपणे ६ ते १० लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनच्या अश्वशक्तीनुसार यात बदल होतो.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा आयुक्तांकडून २२ आणि २४ मार्च रोजी तपासणी पूर्ण झाली. मात्र आता यासंदर्भातील रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या अहवालाची कोकण रेल्वेला प्रतीक्षा आहे. हा अहवाल प्राप्त होताच कोकण रेल्वे मार्गावर विजेवर धावणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहे.

दकम्यान, कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला २०१६ रोजी रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाल्यानं कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या ९७० किमी लांबीच्या रुळांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. या विद्युतीकरणासाठी एकूण १२८७ कोटीं रुपये खर्च करण्यात आल्याचं समजतं. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी ते वेर्णा या मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. त्याची तपासणी करण्यासाठी रेल्वेचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बुधवारी रत्नागिरी ते नांदगावपर्यंत तपासणी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – दापोलीत सोमय्यांचा हायव्होल्डेज ड्रामा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -