घरमहाराष्ट्रखडसेंचा त्रास बास झाला, आता ठाकरे-पवारांनाच सांगतो; शिवसेना आमदाराचा संताप

खडसेंचा त्रास बास झाला, आता ठाकरे-पवारांनाच सांगतो; शिवसेना आमदाराचा संताप

Subscribe

मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद अद्याप सुरुच आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे त्रास देत असल्याचा आरोप शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एकनाथ खडसे टार्गेट करुन त्रास देत आहेत. त्यामुळे आता सर्व वस्तुस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्या मुक्ताई मंदिरावरुन वाद सुरु आहेत. मुक्ताई मंदिरातील ५ कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला. तसंच, सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत, असा घणाघात देखील पाटील यांनी केला. नेहमी माझ्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरते. मीही महाविकास आघाडीचा एक घटक आहे. पण एकनाथ खडसे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकत असल्याचा असा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, ३५ वर्षांपासून मतदारसंघात विकास खुंटल्याची टीका देखील त्यांनी खडसेंवर केली.

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना मुक्ताईनगर, संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवावे असे आव्हान एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील हे खोटारडे आहेत. आम्हीच या कामांचा पाठपुरावा केला होता, असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं आहे.


हेही वाचा – चमच्यांचे विधान ऐकून मोदींची दोन तासांची झोपही उडाली असेल, राऊतांचा चंद्रकांत पाटलांना खोचक टोला

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -