घरमुंबईमुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत आंदोलन कायम

मुख्यमंत्र्यांच्या भेटीपर्यंत आंदोलन कायम

Subscribe

घरासाठी माहुलवासीयांची मंत्रालयावर धडक

49 दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या माहुलवासीयांच्या हक्काच्या घराच्या मागणीकडे मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष करत आहेत. मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधण्यासाठी व त्यांची भेट घेण्यासाठी शनिवारी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्त्वाखाली माहुलवासीयांनी मंत्रालयावर मोर्चा काढला. मुख्यमंत्री मुंबईत नसल्याने भेटू शकले नसले तरी मुख्यमंत्री भेटणार नाहीत. तोपर्यंत आंदोलन कायम ठेवणार असल्याचा निर्धार माहुलवासीयांनी केला.

माहुल येथील प्रदूषित वातावरणातून कुर्ला येथील एचडीआयएलने बांधलेल्या घरांमध्ये स्थलांतर करण्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी आश्वासन दिले होते. मात्र यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र याला महिला उलटला तरी मुख्यमंत्र्यांनी अद्याप काहीच निर्णय घेत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 10 दिवसांत निर्णय घेतला नाही तर मुख्यमंत्र्यांवर ‘जीवन बचाओ’ मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी नोव्हेंबरमध्ये दिला होता. परंतु त्यानंतरही सरकारकडून काहीच हालचाल झाली नाही, तसेच आयआयटीनेही येथील घरे राहण्यायोग्य नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. या पार्श्वभूमीवर शनिवारी माहुलवासीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयावर धडक मोर्चा काढला.

- Advertisement -

कर्णाक बंदर येथून सकाळी 11 वाजता निघालेल्या मोर्चामध्ये कुर्ला, वांद्रे, साकीनाका, विद्याविहार, अंबुजवाडी, मांडवा, अंधेरी आणि वेगवेगळ्या वस्त्यांमधून विस्थापित झालेले हजारो नागरिक आंदोलनात सहभागी झाले. हजारोंच्या संख्येने मंत्रालयावर मोर्चा घेऊन निघालेल्या माहुलवासियांना पोलिसांनी मंत्रालयावर जाण्यसापासून रोखल्याने हा मोर्चा आझाद मैदानाकडे वळवण्यात आला. दुपारी २ च्या सुमारास मोर्चा आझाद मैदानात पोहोचला. मात्र मुख्यमंत्री मुंबईत नाहीत त्यामुळे ते भेटू शकणार नाहीत असे निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून आंदोलकांना देण्यात आला. मुख्यमंत्री कार्यालयातून आमची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरच धरणे आंदोलन करणार, असा निर्धार माहुलवासीयांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -