घरमुंबईनवी परी दिसते डुप्लिकेट

नवी परी दिसते डुप्लिकेट

Subscribe

नव्या सीटर,स्लीपर एसटीमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ

खासगी ट्रॅव्हल्सना टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने सीटर कम स्लीपर बस ताफ्यात समाविष्ट केल्या. मात्र या गाड्या सुरू होताच प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आहे. कारण अनेक प्रवासी एसटीची साधी परिवर्तन बस समजून या नव्या बसेसकडे धावत घेत आहेत. या गल्लतीमुळे प्रवाशांनी एसटी महामंडळाकडे तक्रार करण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत आता नव्या कोर्‍या सीटर कम स्लीपर बसेसला स्टीकर लावण्यात येत आहेत.

महामंडळाने काही वर्षांपूर्वी एसी शिवशाही ताफ्यात दाखल केल्या.यात स्लीपर बसचाही समावेश आहे.परंतु,या बसेसचे तिकीट दर जास्त असल्यामुळे आणि लांब पल्याच्या प्रवासासाठी शिवशाही बसेस आरामदायी नसल्यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली. त्यामुळे महामंडळाने एकाच बसमध्ये सीटर कम स्लीपर सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण 200 बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार असून त्यापैकी पहिल्या टप्यातील 50 बसेस आलेल्या आहेत.

- Advertisement -

9 नोव्हेंबर 2019 ला पहिली बस परळ ते भटवाडी (पाटगांव ) धावली आहे. परंतु, एसटीची परिवर्तन बस आणि नव्या सीटर,स्लीपर बसेसचा रंग आणि दिसायला सारखीत असल्यामुळे प्रवासी परिवर्तन बस म्हणून चढत होते. त्यानंतर प्रवाशांवर बसमधून खाली उतरण्याची नामुष्की ओढवली. त्यानंतर प्रशासन बसेसची प्रवाशांना ओळख पटावी यासाठी बसेसच्या रंगात बदल करण्याचे नियोजन करत आहे.

भविष्यात या बसेसला जाहिराती लावल्यास तर हे स्टीकर दिसणार नाही. त्यामुळे हे तात्पुरते एसटीने नव्या सीटर कम स्लीपर बसेसला स्टीकर लावले आहेत. यावर कायम स्वरुपी उपाय म्हणून एसटी महामंडळ अभ्यास करणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -