घरमुंबईपालघरचं राजकीय समीकरण बदलतंय

पालघरचं राजकीय समीकरण बदलतंय

Subscribe

पोटनिवडणूक ठरतोय युतीच्या कळीचा मुद्दा

आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना भाजप युतीवरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. पालघर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना व भाजप दोघांनीही स्वतंत्रपणे लढून आपली ताकद आजमावली आहे. शिवसेनेने पहिल्यांदाच पोटनिवडणूक लढवून तब्बल अडीच लाखांच्या आसपास मते मिळवली. त्यामुळे शिवसेनेचं बळ वाढलं आहे. त्यामुळे युती न झाल्यास पालघरची पोटनिवडणूक हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. पालघरमध्ये भाजप शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी या तिघांचीही ताकद दिसून आली असली तरीसुध्दा पोटनिवडणुकीनंतर पालघरचं राजकीय समीकरण पार बदलून गेलंय.

भाजपचा आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेले पालघरचे भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा श्रीनिवास हे उमेदवारीसाठी उत्सूक होते. मात्र, आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांना भाजप उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू झाली. दरम्यान, वनगा कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश करून भाजपमध्ये खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. तर, भाजपनं काँग्रेसमधून आलेले माजी मंत्री राजेंद्र गावित यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन शिवसेनेविरोधात रणनीती आखली. भाजपने गावित यांना निवडणूक रिंगणात उतरवले. तर, बहुजन विकास आघाडीने माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली. तर, काँग्रेसने माजी खासदार दामू शिंगडा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पाघलर पोटनिवडणुकीत चौरंगी लढत झाली. शिवसेना व भाजप दोघांनीही इतर पक्षातील आयात उमेदवार घेऊन ही निवडणूक लढवली. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना व भाजप पहिल्यांदाच आमने सामने लढले. निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना व भाजपचे नेतेमंडळी एकमेकांवर तुटून पडली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे विरुध्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा सामना रंगला होता. अटीतटीच्या या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. १९९६ मध्ये वनगा पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. १९९९ मध्ये पुन्हा लोकसभा आणि २००९ मध्ये विधानसभेवर निवडून आले होेते. २०१४ च्या निवडणुकीत चिंतामण वनगा यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा २ लाख ३९ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.

- Advertisement -

विक्रमगड, जव्हार, तलासरी या भाागात आदिवासींची संख्या मोठी असल्याने इथली मते निर्णायक आहेत. या भाागात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचेही वर्चस्व आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. दोन मतदारसंघ खुले प्रभाग असून, ४ अनुसूचित जाती म्हणजे आदिवासींसाठी राखीव आहेत. वसई नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघात बहुजन विकास आघाडीेचे आमदार आहेत. तर, डहाणू आणि विक्रमगड हे भाजपच्या ताब्यात असून, पालघरमध्ये शिवसेनेचा आमदार आहे. पालघर जिल्ह्यातील २६ गावांमधून जाणारी बुलेट ट्रेन डहाणूच्या किनार्‍यावर होऊ घातलेले वाढवण बंदर बडोदा पनवेल महामार्ग, कुपोषणाची समस्या आणि सूर्या धरणाच्या पाण्याचा प्रश्न, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न या मतदारसंघात आहेत. युतीच्या जागा वाटपात पालघर मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला होता. त्यामुळे शिवसेनेने कधीही निवडणूक लढविली नव्हती. मात्र, लोकसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने पालघर मतदारसंघात तब्बल अडीच लाखांच्या आसपास मते मिळवली आहेत. त्यामुळे या भागात शिवसेनेचा एकच आमदार असला तरीसुध्दा शिवसेनेची ताकद असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपशी युती न करता स्वतंत्रपणे लढण्यासाठी शिवसेनेचे बळ वाढले आहे,असेच म्हणावे लागेल.
——————————
२०१७ लोकसभा पोटनिवडणूक …

राजेंद्र गावित (भाजप) …..२ लाख ६८ हजार १६४
श्रीनिवास वनगा (शिवसेना) ….. २ लाख ४० हजार ६१९
बळीराम जाधव (बहुजन विकास आघाडी)…. २ लाख १६ हजार ९५३
———————-

- Advertisement -

२०१४ लोकसभा निवडणूक …

चिंतामण वनगा (भाजप) —- ५ लाख ३३ हजार २०१
बळीराम जाधव (बविआ) ़़—- २ लाख ९३ हजार ६८१
—————
२००९ लोकसभा निवडणूक …

बळीराम जाधव (बविआ) – २ लाख २३ हजार २३४
चिंतामण वनगा (भाजप)- २ लाख १० हजार ८७४
दामोदर शिंगडा (काँग्रेस)- १ लाख ६० हजार ५७०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -