घरमुंबईमूळ स्थानिक झोपडीधारकांची फसवणूक केल्याचा आरोप

मूळ स्थानिक झोपडीधारकांची फसवणूक केल्याचा आरोप

Subscribe

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बाधित होणार्‍या रहिवाशांच्या विविध मागण्यांकरता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मानपाडा येथील कार्यालयासमोर तीव्र निदर्शन करण्यात आली. झोपडीधारकांना पर्यायी थकीत घरभाडे त्वरित अदा करण्यात यावे, कोपरीतील समन्वय व मित्रधाम संस्थेला सुधारित विकास नियमावलीनुसार 5 टक्के अतिरिक्त अनिवासी क्षेत्र मंजूर करण्यात यावे, झोपडपट्टीधारकांचे वैयक्तिक करारनामे एसआरए नियमांप्रमाणे करण्यात यावेत. प्राधिकरणाच्या नियमानुसार घरभाडे न दिल्यास, झोपडीधारकांना वीज, पाण्यासहीत पुन्हा घर बांधण्याची परवानगी देण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

28 जानेवारी रोजी धर्मराज्य पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या आंदोनलनात मिलिंद कुवळेकर, निलेश सावंत, भारती सावंत, चंद्रकांत गायकवाड, आनंद बनकर, भूषण चांदगावकर, राकेश शिंदे यांच्यासह बाधित रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणे शहराच्या पूर्वेकडील कोपरी परिसरातील, धोबीघाट विभागात वास्तव्यास असणार्‍या मूळ स्थानिक नागरिकांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांकडून फसवणूक झाल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे ही निदर्शने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर झोपु प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी जयराम पवार, झोपु प्राधिकरणाच्या तहसीलदार प्रशांती महाजन आणि झोपु प्राधिकरणाचे सहाय्यक निबंधक अजितकुमार सासवडे या प्रशासकीय अधिकार्‍यांकडे आंदोलनकर्त्यांनी कैफियत मांडली.

- Advertisement -

तेव्हा प्राधिकरणाचे अधिकारी व मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत झोपडीधारकांच्या मागण्या मान्य करून त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. यात दरमहा तीन तारखेपर्यंत भाडे व थकीत घरभाडे देण्याचे, तसेच वैयक्तिक करारनामे कार्यालयातून घेऊन जाण्याबाबतचे आदेश देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -