घरमुंबईकल्याणात विद्यार्थ्यांचे मोबाईल लुटणारी टोळी

कल्याणात विद्यार्थ्यांचे मोबाईल लुटणारी टोळी

Subscribe

भूलथापा देत विद्यार्थ्याचे मोबाईल लांबविण्याचे प्रकरणी एका चौकडीला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली असतानाच पुन्हा कल्याण पश्चिम स्टेशननजीक एका इसमाने तीन विद्यार्थ्यांचे मोबाईल लंपास केल्याचाप्रकार घडला आहे. त्यामुळे शहरात विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणारी टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक येथील सर्वोदय इन्क्लेव्ह येथे राहणारा धनेश दिवटे हा विद्यार्थी त्याचे मित्र उज्वल कुर्‍हाडे , विमलकांत त्रिपाठी हे रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्टेशन परिसरातील क्लासचे लेक्चर संपवून घरी जात असताना स्टेशन परिसरात एका अनोळखी इसमाने त्यांना हटकले. अग्रवाल कॉलेजमध्ये तुम्ही मर्डर केला आहे. माझ्या बहिणीचा मर्डर केला असून, तिला टाके पडले आहेत. अशी त्याने बतावणी केली. मात्र दिवटे याने आम्ही त्या कॉलेजचे विद्यार्थी नसल्याचे स्प्ष्ट केले. मात्र त्या इसमाने त्यांना शिवीगाळ करीत त्यांचे मोबाईल तपासणीसाठी मागून मोबाईल हिसकावून घेत तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी महत्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -