घरमुंबईसेटचा निकाल अवघा 6.78 टक्के

सेटचा निकाल अवघा 6.78 टक्के

Subscribe

यूजीसीच्या नव्या नियमाचा फटका बसल्याचा संघटनांचा आरोप

महाराष्ट्र आणि गोव्यासाठी झालेल्या सेट परीक्षेला बसलेल्या 79 हजार 879 उमेदवारांपैकी अवघे 5 हजार 415 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल अवघा 6.78 टक्के इतका लागला आहे. यूजीसीच्या नवीन नियमानुसार ही परीक्षा घेण्यात आली आहे. त्याचाच फटका उमेदवार उत्तीर्ण होण्याला बसला असण्याचे शिक्षक संघटनांकडून सांगण्यात येत आहे.

सहाय्यप प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक असलेली सेट परीक्षा यंदा पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे घेण्यात आली होती. उत्तीर्ण उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यापासून एक महिन्यात आवश्यक असलेली स्व-साक्षांकित पात्रता प्रमाणपत्रे ऑनलाइन अर्जासह सादर करणे अपेक्षित आहे, अशी माहिती विद्यापीठाचे रजिस्टार डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. उत्तीर्ण उमेदवारांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षीची किंवा समकक्ष परीक्षेची गुणपत्रिका, नाव बदलले असल्यास लग्नाचे प्रमाणपत्र/ गॅझेटची प्रत, जात प्रमाणपत्र/ वैधता प्रमाणपत्र, आवश्यक प्रवर्गांसाठी नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र, दृष्टीशी संबंधित किंवा शारीरिकदृष्ट्या विशेष व्यक्तींसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, अनाथ किंवा ट्रान्सजेंडर गटात मोडणार्‍या व्यक्तींसाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करायची आहेत.

- Advertisement -

सेट परीक्षेचे स्वरुप यूजीसीकडून बदलण्यात आले आहे. त्यात परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 6 टक्केच उमेदवार उत्तीर्ण करण्यात यावी अशी अटक यूजीसीकडून घालण्यात आल्याचे यंदा सेटच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात उमेदवार अनुत्तीर्ण झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.

सेट परीक्षेला बसलेल्या उमेदवारांच्या सहा टक्के विद्यार्थी उत्तीर्ण करण्याची अट यूजीसीने घातली आहे. वस्तूनिष्ठ स्वरुपाचा पेपर रद्द करून दोनच पर्यायी स्वरुपाचे पेपर ठेवले आहेत. त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पद्धत बंद केल्याने सेट परीक्षेचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे सेट परीक्षा नेटच्या धर्तीवर घेण्यात यावी.
– कुशल मुडे, संयोजक, ऑल इंडिया नेट अ‍ॅण्ड सेट टीचर्स ऑर्गनायझेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -