घरCORONA UPDATEमुंबईत कोरोनाची दुसरी लाट?; ऐका काय म्हणाले महापालिका आयुक्त

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट?; ऐका काय म्हणाले महापालिका आयुक्त

Subscribe

देशासह जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यातच भारतात महाराष्ट राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सुरूवातीपासूनच मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळाले असून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची लाट आल्याचे बोलले जात आहे. त्यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी सीआयआयकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात माहिती दिली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

काय म्हणाले पालिका आयुक्त

मुंबईत टेस्टिंगचे प्रमाण वाढवले असल्यानेच रुग्णसंख्या वाढत असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल म्हणाले. तसेच महापालिकेने जीम आणि रेस्तराँ मालकांशी चर्चा केली असून काही अटींसह त्यांनी परवानगी देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती इक्बाल चहल यांनी दिली आहे. तसेच शहरात करोनाची दुसरी लाट अजिबात आलेली नाही हे पुन्हा एकदा सांगायचं असल्याचं म्हटलं. मुंबईत आधीच्या सात हजारांच्या तुलनेत सध्या दिवसाला १५ हजार चाचण्या होत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. महापालिकेने जाणीवपूर्वक टेस्टिंग दुपटीने वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आपली आरोग्य यंत्रणा नव्या रुग्णांची काळजी घेऊ शकते याची खात्री होती. याआधी दिवसाला सात हजार चाचण्यांमागे ११०० करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. पण आता टेस्टिंगची संख्या वाढवण्यात आली असल्याने ही संख्या २००० इतकी झाली आहे, असेही चहल म्हणाले. महापालिका दिवसाला २० हजार चाचण्या करण्याची योजना आखत आहे. चाचण्यांची संख्या दिवसाला ३२ हजार इतकी केली तर यामुळे एका दिवसाची रुग्णसंख्या चार हजारांपर्यंत जाईल. पण आपली आरोग्य यंत्रणा त्यासाठी सक्षम आहे, असा विश्वास इक्बाल चहल यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा –

यांना बळीराजाच्या करपलेल्या चेहऱ्याऐवजी दीपिकाचा चेहरा हवाय, म्हणूनच.. – राजू शेट्टी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -