घरमुंबईविद्यापीठाला ३३८ कोटी येणे बाकी

विद्यापीठाला ३३८ कोटी येणे बाकी

Subscribe

प्रशासनाच्या दिरंगाईचा असाही फटका,आर्थिक अडचणीत वाढ होण्याची शक्यता

मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका पुन्हा एकदा विद्यापीठाच्या तिजोरीवर बसला आहे. विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या नियुक्तीचे रोस्टर वेळेवर न दिल्याने पगारापोटी थांबविण्यात आलेली रक्कम आता ३०० कोटींवर आल्याची माहिती समोर आली आहे. १९९९ पासून विद्यापीठाला ३३८ कोटी ६० लाख १० हजार ५३१ रुपये येणे बाकी असल्याची माहिती हाती आली असून परिणामी विद्यापीठाच्या तिजोरीवर त्याचा आर्थिक फटका बसत असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.

मुंबई विद्यापीठ अनुदानित आणि विनाअनुदानित तत्त्वार प्राध्यापक आणि इतर भरती केली जाते.सध्याच्या घडीला विद्यापीठात अनुदानित १६८४ पदांपैकी ९४७ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. ही भरती करताना विद्यापीठाने रोस्टर म्हणजे बिंदु नियमावली तयार करुन ती राज्य सरकारकडे पाठविणे आवश्यक असते. मात्र मुंबई विद्यापीठाकडून रोस्टरची प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आलेली नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठाकडे सुमारे २५ टक्केच वेतन सरकाकडून दिले जात आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या वर्षभरापूर्वी राज्य सरकारने टास्कफोर्स देखील नेमला होता. त्याचा अहवाल विद्यापीठाकडे देखील देण्यात आला आहे.

- Advertisement -

मात्र अद्याप हा प्रश्न स सुटल्याने राज्य सरकारकडे असलेली थकित रक्कम वाढत चालली आहे. याबाबत अनेक सिनेट सभेत देखील हा प्रश्न गाजलेला आहे. दरम्यान, विद्यापीठातील कर्मचार्‍यांचे आणि प्राध्यापकांचे वेतन वेळवर होत असले तरी त्यासाठी सामान्य निधीतून हा पगार केला जात असून तरीही विद्यापीठाच्या फंडावरील वेतनाचा भार वर्षांगणिक वाढत गेला आहे. २०१६ ते फेब्रुवारी २०१९ या तीन वर्षांतील थकबाकी १११ कोटी आहे.

मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी ही माहिती समोर आणली आहे. या माहितीनुसार १९९५ पासून विद्यापीठाला ३३८ कोटी ६० लाख १० हजार ५३१ रुपये येणे बाकी आहे. यात सर्वाधिक रक्कम ही २००३ ते २०१६ या कालावधतील १५७ कोटी १२ लाख ६८ हजार २०१ इतकी आहे. वीस वर्षे शुल्क थकलेले असताना विद्यापीठाने या मुद्दयाकडे दुर्लक्ष करणे गंभीर आहे. अधिसभेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे तांबोळी यांनी सांगितले. तसेच याबाबत प्रशासनाकडून उत्तर घेणार असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

वित्तीय वर्ष शासनाकडून येणारी थकबाकी
१९९५-९६ ते १९९७ – ९८ ६,१२,०९,२३०
१९९८-९९ ते २००२- ०३ ११,१६,१३,९००
२००३-०४ ते २०१५-१६ १५७,१२,६८,२०१
२०१६ ते २०१९ १११,३२,९४,६१४
सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी ५,५४,६४,०४५
शासन पदावरील नियुक्त्यांचे थकीत वेतन ३९,५७,५६,१३०
शासन पदावरील अस्थाई कर्मचार्‍यांचे वेतन ७,५४,०४,४११
एकूण रक्कम ३३८,६०,१०,५३१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -