घरमुंबईपूँछमधील गावकर्‍यांनी घडवले उत्तम माणुसकीचे दर्शन

पूँछमधील गावकर्‍यांनी घडवले उत्तम माणुसकीचे दर्शन

Subscribe

भारतीय जवान हुतात्मा झाल्याने ईदसह इफ्तार पार्टीही साजरी न करण्याचा निर्णय

अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे ५ जवान हुतात्मा झाल्याने रमजान ईदसह इफ्तार पार्टी साजरी न करण्याचा निर्णय घेत जम्मू-काश्मीरमधील पूँछमधील संगियोते गावाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून दहशतवाद्यांना आपल्या कृतीतून उत्तर देत उत्तम माणुसकीचे दर्शन यामार्फत घडवल्याने या गावकर्‍यांचे सर्वत्र गोडवे गायले जात आहेत.

गुरुवारी भारतीय सैन्यदलाच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात राष्ट्रीय रायफल्सचे ५ जवान हुतात्मा झाले होते. हे जवान याच ट्रकमधून इफ्तार पार्टी आणि रमजानसाठी नागरिकांना लागणारी फळे आणि इतर वस्तू घेऊन पूँछमधील संगियोते गावाकडे जाण्यासाठी निघालेले असतानाच हा हल्ला घडला होता. बालाकोटमधील राष्ट्रीय रायफल्सच्या बसूनी मुख्यालयातूनच ट्रकमधून साहित्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येत असते. त्यामुळे राष्ट्रीय रायफल्सचे जवान या भागात तैनात असतात, परंतु ईद साजरी होण्याच्या दोन दिवसांआधीच हा हल्ला घडल्याने सांगियोते गावाने यंदाच्या वर्षी इफ्तार पार्टीसह रमजान ईदही साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

गुरुवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत आपले ५ जवान शहीद झाले. त्यामुळे आता कसली इफ्तार पार्टी आणि कसली रमजान ईद साजरी करायची? या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली आणि आमच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आम्ही ईदच्या दिवशी केवळ नमाज पठण केले. गावातील कोणीही ईद साजरी केली नाही. जळालेल्या ट्रकचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये टरबूज, सफरचंद आणि इतर वस्तू दिसत होत्या. आमच्या गावापर्यंत या वस्तू पोहचविणार्‍या जवानांनाच अशा प्रकारे दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. त्यामुळे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही यंदा कोणतीही इफ्तार पार्टी आणि ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
– मुख्तियाज खान, सरपंच, संगियोते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -