घरमहाराष्ट्र२०२४ हे वर्ष दंगलीचे असेल; आव्हाडांच्या विधानानंतर नवा राजकीय वाद सुरू

२०२४ हे वर्ष दंगलीचे असेल; आव्हाडांच्या विधानानंतर नवा राजकीय वाद सुरू

Subscribe

रामनवमी आणि हनुमान जयंतीसारखे सण आणि त्यांच्या निघणार्‍या मिरवणुका या दंगली घडवण्यासाठीच असतात. दंगलींमुळे शहरांचे वातावरण अत्यंत विषारी झाले आहे. त्यामुळे आगामी २०२४ हे वर्ष दंगलींचे वर्ष असेल, असे माझे स्पष्ट मत असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात केल्याने आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

आव्हाड यांच्या या विधानास भाजपने आक्षेप घेतला असून त्यांच्या विरोधात अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांनी ही तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली तर राज्य मानवाधिकार आयोगानेही आव्हाड यांच्या विधानाची दखल घेतली असून त्यांना नोटीस बजावल्याची माहिती आहे.

- Advertisement -

सनसनाटी निर्माण करणे योग्य नाही-फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आव्हाडांना प्रत्युत्तर देत, दंगलींसाठी रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली जाते, असे म्हणणे एकप्रकारे समाजाचा अपमान आहे. रामभक्तांचाही अपमान आहे. त्यामुळे असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. हे विधान आक्षेपार्ह आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती अत्यंत शांततेने साजरी केली जाते. लोकांच्या मनात प्रभू श्रीराम आणि हनुमानाप्रति प्रचंड श्रद्धा आहे. ती श्रद्धा यानिमित्ताने व्यक्त केली जाते. महाराष्ट्रात भविष्यात दंगली होतील या वक्तव्याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा, दंगली घडवण्याबाबत तुम्ही ठरवलं आहे का? अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे का? असाही सवाल आमच्यासमोर उपस्थित होत आहे. त्यामुळे नेत्यांनी अशा प्रकरणात संवेदनशीलपणे वागले आणि बोलले पाहिजे. सनसनाटी निर्माण करणे योग्य नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मी समाज जोडतो
मी समाजाला जोडणारा माणूस आहे. माझे कोणतेही विधान मी अत्यंत गांभीर्याने आणि विचारपूर्वक करतो. मी माझ्या विधानावर ठाम आहे. समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी आमच्यासारखी लोक ४० वर्षे काम करीत आहेत. मी माझ्या डोळ्यासमोर अनेक दंगली पाहिल्या आणि शमवल्या आहेत. त्यामुळे दंगल हा भाग माझ्याशी कधी जोडताच येणार नाही.
– डॉ. जितेंद्र आव्हाड,आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -