घरमुंबईमुंबईत लॉकडाऊनची गरज नाही

मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही

Subscribe

रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांच्या वर,रुग्णांची संख्या दुपटीनं वाढण्याचा कालावधी ५० दिवसांपेक्षाही जास्त

मुंबईतील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असल्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा १०० टक्के लॉकडाऊन करण्याची गरज नाही, असे मत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असला तरी मुंबईतील बाधित क्षेत्रात निर्बंध कायम असणार आहेत.

तब्बल ७२ ते ७५ दिवसांच्या लॉकडाऊननंतर जूनच्या सुरुवातीपासून राज्य सरकारने ‘अनलॉक’ला सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकल, मेट्रो आणि एसटी सेवा वगळता इतर बहुतांश वाहतूक सेवांना काही प्रमाणात परवानगी देण्यात आली. सरकारी व खासगी कार्यालये, हॉटेल, सलून यांनाही काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनलॉकला सुरुवात झाल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याबरोबर रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. ठाणे, पुणे व रायगडमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली दिसत आहे. रायगड जिल्ह्यात रुग्णांची संख्या ८ हजारांवर गेली आहे.

- Advertisement -

त्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात व रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. तर, ठाण्यात लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत नेमका काय निर्णय घेतला जाणार याविषयी मुंबईकरांच्या मनात धाकधूक होती. मात्र, महापालिकेचे आयुक्त चहल यांनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे. ‘मुंबईत पुन्हा एकदा १०० टक्के लॉकडाऊनची गरज नाही,’ असे चहल यांनी सांगितले.

‘मुंबईतील कोरोनाची स्थिती पुणे आणि ठाण्यासारखी नाही. येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ७० टक्क्यांच्या वर गेला आहे. तर, रुग्णांची संख्या दुपटीनं वाढण्याचा कालावधी ५० दिवसांपेक्षाही जास्त आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी सुधारणा होईल,’ असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -