घरमहाराष्ट्रसीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी

Subscribe

बारावीचा निकाल 88.78 टक्के

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सोमवारी बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले. बारावीचा निकाल 88.78 टक्के लागला आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून, 92.15 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.19 मुले उत्तीर्ण झाले आहेत. तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा निकाल 66.67 टक्के इतका लागला आहे. हा निकाल मंडळाच्या cbseresults.nic.in वर संकेतस्थळावर जाहीर झाला. बारावीच्या निकालामध्ये लखनौची दिव्यांश जैन या विद्यार्थिनीने 600 पैकी 600 गुण मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ज्या विषयांच्या परीक्षा झाल्या त्याच्या आधारे सीबीएसईमार्फत सोमवारी बारावीचा निकाल जाहीर झाल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. सीबीएसईचा बारावीच्या परीक्षेला देशभरातून 12 लाख 3 हजार 595 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 11 लाख 92 हजार 961 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 10 लाख 59 हजार 80 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.

- Advertisement -

बारावीचा निकाल यंदा 88.78 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल 5.38 टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी 83.40 टक्के निकाल लागला होता. यंदा बारावीची परीक्षा 4984 केंद्रावर झाली. बारावीच्या निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. मुलांंच्या तुलनेत 5.96 टक्के अधिक मुलींचा निकाल लागला आहे. विभागामध्ये त्रिवेंद्रम 97.67 टक्के, बेंगळूरू 97.05 टक्के आणि चेन्नई 96.17 टक्के यांची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. तर पुणे विभागाने 90.24 टक्क्याने 10 क्रमांक पटकावला आहे.

दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
सीबीएसईचा जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात 1 लाख 96 हजार विद्यार्थ्यांना यंदा 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यामध्ये 90 टक्के आणि त्यापेक्षा अधिक टक्के मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 57 हजार 934 तर 95 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 38 हजार 686 इतकी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -