घरमुंबईहे सरकार निष्क्रिय आहे

हे सरकार निष्क्रिय आहे

Subscribe

चांदिवलीच्या सभेत राहुल गांधींचा घणाघात

शेतकरी आत्महत्या करत आहे. मात्र सरकार निष्क्रिय आहे. तुम्ही कर भरता मग हा कर कुठे जातो; याचे उत्तर सरकार देत नाही, असा घणाघात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईत केला. तर हे चित्र कोणी श्रीमंत बदलणार नाही तर तुम्ही काँग्रेसला मतदान करून हे चित्र बदलायचं आहे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

काँग्रेसचे चांदिवली येथील उमेदवार नसीम खान यांच्या प्रचारार्थ रविवारी मुंबईत चांदिवली येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी काळापैसा, शेतकरी आत्महत्या यारख्या प्रश्नांना हात घालत केंद्रासह राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली. राहुल गांधी म्हणाले की, मोदी आणि फडणवीस यांचा जेव्हा विजय झाला तेव्हा त्यांनी खूप आश्वासन दिली होती. म्हणाले, सत्तर वर्षात काही झाले नाही. मात्र मी सांगतो, भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्था सोबत मुकाबला करू शकते. आजच्या सरकारने कर लावत सर्व सामान्य माणसाचे कंबरडे मोडले. नोटबंदी केली तेव्हा म्हणाले काळे धन नष्ट करायचे आहे. नोटा बदलण्यासाठी मुंबईकर रांगेत उभे होते. मात्र ज्यांच्याकडे काळे धन आहे ते देशाबाहेर गेले.

- Advertisement -

आज देशात गुंतवणूक होत नाही. व्यवसायिक देश सोडून जात आहेत. भाजप देशाला विभागण्याचे काम करत आहे. गरिबांचे किती पैसे माफ केले? याचे उत्तर सरकारकडे नाही. राफेलमध्ये गैरव्यवहार झाला हे देशाला माहीत आहे. छोटे उद्योग आज बंद होत आहेत. धारावी येथील उद्योग बंद होत आहेत. हे कोणी केले तर नरेंद्र मोदी यांनी केले. मोदी चंद्राच्या गोष्टी करतात. मात्र शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि हे काहीच बोलत नाही. बँक घोटाळे होतात. मात्र सरकार काही बोलत नाही. लोकांचे लक्ष विचलित करण्याचे काम हे सरकार करत आहे. आता देशातील शक्ती नष्ट करण्यासाठी काम सुरू आहे. युवा पिढीला भविष्य दिसत नाही. मात्र मोदी देश फिरण्यात व्यस्त आहेत.

जीएसटीमुळे कोणाचा फायदा झाला? कोणाचा नाही, अशी टीका देखील राहुल गांधी यांनी केली.तर तर देशात आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. पुढे काय होईल काही सांगता येत नाही. 40 वर्षात नव्हती तेवढी बेरोजगारी वाढली आहे. तरुणांना भविष्य राहिलेले नाही. काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था मजबुत होती परंतु आता अर्थव्यवस्थाच कुठे राहिलेली नाही. डॉ मनमोहन सिंग यांच्या काळात संपूर्ण जगामध्ये भारत देशाची चांगली प्रतिमा होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या अर्थव्यवस्थे वर बोलायचे. आज ती परिस्थिती राहिली नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर यावेळी राहुल गांधी यांच्यासह मल्लिकाअर्जुन खरर्गे, मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नसीम खान आदींची भाषणे झाली.

- Advertisement -

मेक इन इंडिया नव्हे मेड इन चायना सुरु झालायं
यावेळी नरेंद्र मोदींच्या विदेशी दौर्‍यावर समाचार घेताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशात फिरून मोठं मोठी भाषणे करतात परंतु देशातील बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कोलमडलेली अर्थव्यवस्था, नोटा बंदी, जीएसटी अशा गंभीर विषयावर दोन शब्द ही बोलत नाही. निदान त्यांनी पीएमसी बँकेवर तरी दोन शब्द बोलावेत. पीएमसी बँकेवरील संचालक कोण होते त्यांचा कोणाशी संबंध होता, ही बँक का बुडाली, यावर ते बोलत नाहीत. मेक इन इंडियाचा नारा दिला परंतु संपूर्ण देशात मेड इन चायना सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी चायनाच्या राष्ट्रपती बरोबर चहा पित बसले होते, अशी देखील त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -