घरदेश-विदेशहिंमत असेल तर ३७० कलम पुन्हा लागू करण्याची घोषणा करा

हिंमत असेल तर ३७० कलम पुन्हा लागू करण्याची घोषणा करा

Subscribe

जळगावच्या सभेत पंतप्रधान मोदींचे काँग्रेस-राष्ट्रवादीला आव्हान

देशातील काही राजकीय पक्ष राष्ट्रहितासाठी घेतलेल्या निर्णयाचे राजकारण करत आहेत. असे हे पक्ष महाराष्ट्रात मते मागण्यासाठी फिरत आहेत. त्यांच्या नेत्यांच्या मुलाखती पाहिल्यास त्यांची भूमिका शेजारील देशाच्या भाषेसारखी आहे. जम्मू, काश्मीर विषयी देश जो विचार करतो, त्याच्या उलट विरोधक विचार करतात. देशाच्या भावनेसोबत उभे राहण्यात त्यांना संकोच वाटतो. हिंमत असेल तर विरोधकांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात ‘कलम ३७० पुन्हा लागू करू’, असे आश्वासन द्यावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचारसभा रविवारी (दि.१३) जळगाव येथे पार पडली. सभेत त्यांनी कलम ३७० रद्द करणे, जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन, तिहेरी तलाक या मुद्यांवर भाष्य करतानाच काँग्रेस व राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता व्यक्त केली होती. त्याचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, थकलेले साथीदार एकमेकांचे आधार होऊ शकतात; पण महाराष्ट्राची स्वप्ने आणि येथील युवकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करण्याचे माध्यम होऊ शकत नाहीत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी उवाच…
<एका श्रेष्ठ भारतासाठी तुम्ही जनादेश दिल्याने जगात भारताचा मान वाढतो आहे.
<जगाला आज भारताच्या १३० कोटी जनतेच्या ताकदीची जाणीव होतेय.
<जम्मू-काश्मीर आणि लडाख केवळ जमिनीचा तुकडा नाही तर भारतमातेचं मस्तक आहे.
<काही राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांकडून राष्ट्रहिताच्या निर्णयांवरून राजकारण करत आहेत.
<जम्मू-काश्मीर व लडाखबाबत देशाच्या विचारांपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची उलट वक्तव्ये
<महाराष्ट्राला पाच वर्षांपूर्वी स्थिर व पारदर्शक सरकारचे आश्वासन आम्ही पूर्ण केले.
<फडणवीस व त्यांच्या सहकार्‍यांनी पाच वर्षांत महाराष्ट्राला विकास आणि विश्वासाच्या मार्गावर नेण्याचे काम केले.
<रस्ते, सिंचन व्यवस्था, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांत महाराष्ट्र आघाडीवर आहे.
<जळगावसह हा संपूर्ण भाग रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने जोडण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

पवारांची उडवली खिल्ली
शरद पवार यांच्या एका सभेतील युवा नेत्याला कोपरखळी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, एक नेते सोफ्यावर बसले होते. तीन-चार जणांनी हार घातला. यावेळी या मोठ्या नेत्याने त्या युवा नेत्याच्या डोक्यावर कोपर मारून त्याला बाजूला केले. एवढ्या मोठ्या नेत्याचे मन इतके लहान आहे की ते आपल्या युवा नेत्याला सोबत घेऊ शकत नाहीत, ते महाराष्ट्राला काय पुढे नेतील, अशा शब्दात पवार यांची खिल्ली उडवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -