घरमुंबईठाण्यात साडेचार हजार धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर!

ठाण्यात साडेचार हजार धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर!

Subscribe

ठाण्यातील धोकादायक इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेनंतर ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठाण्यातील धोकादायक इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेनंतर ठाण्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार ठाण्यात सुमारे ४५०० इमारती धोकादायक आहेत. यामध्ये लाखो रहिवाशांचे वास्तव्य आहे. त्यामुळे लाखो ठाणेकरांचा जीव टांगणीला असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

ठाण्यातील धोकादायक इमारातींची समस्या नवीन नाही. धोकादायक इमारती कोसळल्याने जिवीत व वित्तहानी मोठया प्रमाणात होत असते. यापूर्वीही मुंब्रा परिसरातील धोकादायक इमारती कोसळून अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ४५०० हजार इमारती धोकादायक आहेत. महापालिकेने अतिधोकादायक, रिकामी करून दुरूस्त करणे आणि रिकामी न करता दुरूस्त करणे आणि किरकोळ दुरूस्ती करणे अशा चार वर्गात इमारतींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी १०३ इमारती अति धोकादायक अवस्थेत आहेत. यापूर्वी पालिकेने ८२ इमारती खाली केल्या असून, ८ इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. रिकामी करून दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या ९८ इमारती आहेत तर रिकामी न करता दुरूस्तीची गरज असलेल्या २२९७ तर किरकोळ दुरूस्तीची आवश्यकता असलेल्या २००९ अशा इमारती धोकादायक म्हणून पालिकेने जाहिर केल्या धोकादायक इमारतीचा वीज व पाणी कनेक्शन तोडण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे. धोकादायक इमारती अनेक वर्षांपासून पुनर्बांधकामाच्या प्रतिक्षेत आहेत. इमारत धोकादायक असतानाही आपला व कुटूंबाचा जीव धोक्यात घालून रहिवासी धोकादायक इमारतीत राहतात. कारण ती जागा पून्हा आपल्याला मिळेल याची खात्री वाटत नसते. मात्र क्लस्टरच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न कधी निकाली लागतो याकडं सर्वांच लक्ष आहे.

- Advertisement -

क्लस्टरमुळे मिळणार दिलासा

ठाण्याचे माजी पालकमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारामुळे ठाणे महानगरपालिकेने वागळे इस्टेट परिसरात समूह विकास योजना अर्थात क्लस्टर योजनेला मंजुरी दिली आहे. असा निर्णय घेणारी ठाणे ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. क्लस्टर योजनेमुुळे धोकादायक इमारतींच्या पूर्नविकासाचा प्रश्न निकाली निघणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर किसननगर वागळे इस्टेट परिसरात ही योजना राबविल्यानंतर शहरातील इतर भागात राबवणे शक्य होणार आहे. क्लस्टर योजनेतून रहिवाशांना मालकी हक्कातून घरे मिळणार आहेत. त्यामुळे भविष्यात धोकादायक इमारतींतील रहिवाशांना क्लस्टरचा मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रभाग समिती : धोकादायक इमारतींची संख्या

उथळसर : १२५
कळवा : १७३
दिवा : ८३४
नौपाडा कोपरी : ४७३
माजीवडा मानपाडा : ६०
मुंब्रा : १४४१
लोकमान्य सावरकर नगर : २४६
वर्तकनगर : ६१
वागळे : १०८६

- Advertisement -

अमन सदन गॅलरीचा भाग कोसळला, एक महिला जखमी

ठाण्यातील राबोडी येथील शिवाजीनगर भागातील अमर सदन या तीन मजली धोकादायक इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग खाली कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यावेळी गॅलरीतून जात असलेल्या सुरेय्या अक्रम शेख नामक ४२ वर्षीय महिला गॅलरीसह खाली केासळली. त्यांच्या पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झालीअसून त्यांना उपचारासाठी मंबईच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ही इमारत तळ अधिक दोन मजल्यांची असून४५ वर्षेजुनी होती. धोकादायक असल्याने तीन ते चार रहिवाशी राहात होते. ही इमारत रिकामी करून तोडकाम करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा –

शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सोनिया गांधीचा अखेर हिरवा कंदील

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -