घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करताहेत - पवार

मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करताहेत – पवार

Subscribe

विरोधी आमदारांना ईडीद्वारे धमकावले जात आहे. त्याचप्रमाणे स्वत: मुख्यमंत्री आमदारांना फोन करत आहे', असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

‘विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर वाढलंय आहे. तसेच सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात फोडाफोडी होत आहे. नेते फोडण्यासाठी सरकारी एजन्सीचा वापर केला जात असून विरोधी आमदारांना ईडीद्वारे धमकावले जात आहे. त्याचप्रमाणे स्वत: मुख्यमंत्री आमदारांना फोन करत आहे’, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. ‘संसदेत एकमताने मंजूर केलेल्या पक्षांतर बंदी कायदा धुळीस मिळवला जात आहे. ईडी, सिबीआय, अँटी करपशन या संस्थांना हाताशी धरून सहकारी संस्थांमध्ये सहभागी असलेल्या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दबाव टाकून भाजप – शिवसेनेत ओढले जात आहे. यासाठी राज्य सहकारी बँकेचाही वापर केला जात आहे. असेच प्रयोग कर्नाटक पाठोपाठ मध्यप्रदेश, राजस्थान मध्ये सुरू झाले असून लोकशाही धोक्यात आली आहे. आमदार फोडण्याचे प्रयोग यापूर्वीही झाले असून आम्ही नव्या पिढीच्या माध्यमातून निश्चितपणे याविरोधात लढा देऊ’, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.


हेही वाघा – अखेर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचाही राजीनामा

- Advertisement -

पक्षांतर करण्यासाठी सरकारचा दबाव

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पक्षांतराचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते भाजप सेनेत गेले आहेत, हे वास्तव आहेत. यापैकी बहुतांश जण सहकारी संस्थांचे संचालक आहेत. संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्याने त्यांच्यामागे ईडी, सीबीआय, अँटी करपशन ची चौकशीची भिती दाखवली जात आहे. मुख्यमंत्री आणि अन्य दोन – तीन मंत्री याच कामावर लागले आहेत, असे सांगत त्यांनी पंढरपूरचे कल्याण काळे, हसन मुश्रीफ, चित्रा वाघ यांची उदाहरणे त्यांनी यावेळी दिली.

चित्रा वाघ यांच्यावर दबाव

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या एका दिवसाने पक्षाला दुसरा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सचिन अहिर यांच्याप्रमाणेच चित्रा वाघ यादेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा शुक्रवारी दिवसभर सुरू होत्या. शेवटी त्यांनी राजीनामा दिला आहे. यावर पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, ‘विरोधी आमदारांना धमकावले जात असून चित्रा वाघ आणि हसन मुश्रिफांना देखील धमकावले गेले आहे. तसेच चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात असणाऱ्या केसेस सोडवण्यासाठी पक्षांतर केले आहे’, असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. तसेच त्या पक्ष सोडण्यापूर्वी भेटून गेल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

- Advertisement -

भुजबळ यांना जाणीव पूर्वक गोवण्यात आले

छगन भुजबळ अडचणीचे ठरतील म्हणून त्यांना अडकवण्यात आले. प्रकरण काय तर एका झोपडपट्टीच्या टीडीआरच्या बदल्यात बिल्डरकडून दिल्लीतील महाराष्ट्र सदन, मुंबईतील एक गेस्ट हाऊस आणि आरटीओच्या इमारतीचे काम त्यांनी करून घेतले. बरे तर हा निर्णय मंत्रिमंडळाचा असताना केवळ त्या विभागाचे मंत्री म्हणून भुजबळ यांना जाणीव पूर्वक गोवण्यात आले आहे, असा आरोपही पवार यांनी यावेळी केला.


हेही वाचा – ‘सचिन अहिर यांचा मुंबईत आम्ही पराभव करु’


 

कॉंग्रेस – राष्ट्रवादी विधानसभा एकत्र लढवणार

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत आहे. तसेच आगामी विधानसभेमध्ये आघाडी होणार असून १४० – १४० जागांची बोलणी झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस – राष्ट्रवादी विधानसभा एकत्र लढवणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.

नवीन पिढीला संधी देणार

स्वपक्षाचे आमदार फुटल्याचा हा अनुभव मला नवीन नाही. एकदा तर ७०आमदारांपैकी ६४ आमदार फुटले होते. पण मी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. पक्षांतर केलेले मात्र पडले. त्यामुळे आगामी निवडणुकीतही अनेक नवीन चेहेऱ्यांना संधी दिली जाईल असे सांगत पवार यांनी अप्रत्यक्षपणे फुटलेल्या आमदारांना इशारा पवार यांनी यावेळी दिला.
पिचडानां त्यावेळी विकास नाही दिसला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -