घरमुंबईवाहतूक उद्यानातील लोकजागृतीला 'रेड सिग्नल'

वाहतूक उद्यानातील लोकजागृतीला ‘रेड सिग्नल’

Subscribe

डोंबिवलीच्या या उद्यानात रस्त्यांची वळणे, वाहतुकीचे नियम, वाहतूक सुचना फलक, सिग्नल यंत्रणा आदींच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या त्यांची दुरावस्था पाहायला मिळते आहे.

बेशिस्त वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी झटत असतात. उपलब्ध मनुष्यबळात व साधनसामुग्रीत पोलिसांची धडपड सुरू असते. मात्र, अपघात टाळायचे असतील तर वाहतूक नियमांचे प्रत्येकानेच पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थी दशेत असल्यापासूनच वाहतुकीच्या नियमाविषयी जागृती झाल्यास भविष्यात वाहतूक नियमांचे पालन करणारा एक नागरिक घडणार आहे. या हेतूनेच कल्याण डोंबिवली महापालिकेने वाहतूक उद्यान साकारलं आगे. मात्र, गेल्या दहा वर्षात उद्यानाची दुरावस्था झाली आहे. सिग्नल यंत्रणा, दिशादर्शक फलक आदी साधनसामुग्री तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहतुक नियमांच्या लोकजागृतीला रेड सिग्नल आहे.  शालेय विद्यार्थी आणि वाहन चालक यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी डोंबिवली पूर्वेतील संगीतावाडी परिसरात माँ साहेब मीनाताई ठाकरे वाहतूक उद्यान साकारण्यात आले आहे.

विद्यार्थी करतात नुकसान…

या उद्यानात रस्त्यांची वळणे. वाहतुकीचे नियम, वाहतूक सूचना फलक, सिग्नल यंत्रणा, तीनशे आसन क्षमतेचे पॅव्हेलियन, रखवालदार चौक, पदपथबसथांबा आणि पादचारी पुलांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या  आहेत. यासाठी पालिकेने लाखो रूपये खर्च केले आहेत. सध्या उद्यानातील हे साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहेत. सर्वच सिग्नल यंत्रणा पूर्णपणे तुटलेल्या असून त्यातील वायरही काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाहतूक उद्यानात आणले जात नाही. उद्यान खुले ठेवण्यात आल्याने मुले खेळण्यासाठी येतात त्यांच्याकडूनच  सिग्नल यंत्रणेची तोडफोड करण्यात आल्याचे कर्मचार्‍यां सांगण्यात आले. अनेकवेळा मुले उद्यानात क्रिकेटही खेळतात पण पालिकेच्या कर्मचार्‍यांना ते जुमानत नाहीत. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या काळात वाहतुकीचे नियम सांगण्यासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रचे आयोजन करण्यात येते. त्यानंतर या उद्यानाकडे ढुंकूनही पाहिले जात नाही

- Advertisement -
उद्यानातील प्रतिकृतींची दुरावस्था.

तुटलेल्या सामानाकडे पालिकेचा कानाडोळा

सुरूवातीला शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम कळावेत यासाठी वाहतूक पोलिसांकडून येथे प्रशिक्षण दिले जायचे. आता  मात्र हा प्रकारही फारसा पाहायला मिळत नाही. कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून उद्यानाचा वापर व्हावा असा मुद्दा पुढे आला होता. मात्र आरटीओनेही याकडं दुर्लक्ष केलं आहे. पालिकेकडून उद्यानाची चांगल्या प्रकारे देखभाल ठेवली जात असली तरी त्यातील तुटलेल्या साहित्याकडे कानाडोळा केला आहे. पालिका प्रशासन, वाहतूक शाखा आणि आरटीओ प्रशासन यांच्या अनास्थेमुळेच वाहतूक उद्यान केवळ शोभेचे ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. 

ट्रॅफिक गार्डनच्या दुरूस्तीबाबत नवीन अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर दुरूस्ती करण्यात येईल. दरम्यान, वाहतूक पोलिसांना हे उद्यान चालविण्यासासाठी देण्यात आले आहे. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती  दिली जाते. मात्र, सध्या येथे विद्यार्थी कमी प्रमाणात येत असल्यामुळे हे उद्यान सर्वांसाठी खुले ठेवण्याचा पालिकेचा मानस आहे. – संजय जाधव, उद्यान अधिक्षक केडीएमसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -