घरमहाराष्ट्रपुण्यातील 'फर्ग्युसन' कॉलेजचे रुपांतर होणार 'विद्यापीठात'

पुण्यातील ‘फर्ग्युसन’ कॉलेजचे रुपांतर होणार ‘विद्यापीठात’

Subscribe

पुण्यातील प्रसिद्ध 'फर्ग्युसन' कॉलेजचे रुपांतर आता 'विद्यापीठात' होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे.

विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे येथील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या पुण्यातील प्रसिद्ध ‘फर्ग्युसन’ कॉलेजचे रुपांतर आता ‘विद्यापीठात’ होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली असून नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९ – २० पासून सुरु होणार आहे. या शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासह जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर रोजगाराभिमुख नवनवीन अभ्यासक्रम, संशोधन, विकास आणि नवोपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता देण्याचे शासनाचे धोरण आहे. या संकल्पनेचा पुढील टप्पा म्हणून स्वायत्तता दिलेल्या महाविद्यालयांना भौतिक संरचना आणि पायाभूत सुविधांसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते आहे.

‘फर्ग्युसन’ महाविद्यालयाविषयी थोडक्यात…

राज्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असणाऱ्या फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना १८८४ मध्ये पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आली. गुणवत्तापूर्ण आणि उत्कृष्ट अशा उच्च शिक्षणाची परंपरा असणारे हे महाविद्यालय भारतातील महाविद्यालयांच्या एनआयआरएफ मानांकनात १९ व्या स्थानावर असून महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या स्वायत्त दर्जा असणाऱ्या या महाविद्यालयाचे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानामधील (रुसा) मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यापीठात रुपांतर करण्यात येत आहे.

- Advertisement -

रुसातील सूचनांनुसार स्वायत्त महाविद्यालयांची दर्जावाढ करुन त्यांचे विद्यापीठात रुपांतर करण्याच्या योजनेंतर्गत राज्यात प्रथमच खाजगी अनुदानित संस्थेच्या माध्यमातून नवीन विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. यानुसार विद्यापीठासाठी आवश्यक पदनिर्मिती आणि भरती करण्याच्या प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. त्याचा खर्च डेक्कन एज्युकेशन सोसायटीने करण्यास आणि महाविद्यालयाची मालमत्ता विद्यापीठास हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.


वाचा – पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दोन विद्यार्थ्यांचे रॅगिंग

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -