घरमुंबईलोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

लोकलमधून पडून एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी

Subscribe

गणेशोत्व असल्यामुळे मुंबईमधील लोकलला खूप गर्दी असते. अशातच एक दुर्देवी घटना घडली आहे. लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कुर्ला-सायन स्थानका दरम्यान ही घटना घडली आहे.

मुंबईमध्ये लोकलमधून पडून एका प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. मंगळवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान सायन-कुर्ला स्थानका दरम्यान ही घटना घडली आहे. दादरवरुन ठाण्याला जाणाऱ्या लोकलमधून तोल जावून तीन प्रवासी पडले. अपघातानंतर जखमी झालेल्या तिन्ही प्रवाशांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यामधील एका प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गर्दीमुळे दरवाजात उभ्या राहिलेल्या तीन प्रवाशांचा तोल गेला आणि ते रेल्वे ट्रॅकवर पडले. यासंदर्भात कुर्ला जीआरपीला फोन आला होता. त्यानंतर रेल्वे रुळावर पडलेल्या तिघा प्रवाशांना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामधील एका प्रवाशाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दोन जण गंभीर झाले असल्याने त्यांना सायन हॉस्पिटलला हलवण्यात आले. लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. गणेशोत्सवामुळे लोकलमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. अशावेळी प्रवाशांनी थोडी काळजी घ्यावी. प्रवासा दरम्यान गर्दी टाळावी, असे आवाहन सध्या करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -