घरमुंबईया नराधमाने केले १२ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

या नराधमाने केले १२ अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Subscribe

वरील फोटोतील नराधमाकडे नीट बघा. त्याचा चेहरा लक्षात ठेवा. कारण हा नराधम माथेफिरु आहे. तो अल्पवयीन मुलींना लक्ष्य करून त्यांच्यावर बलात्कार करतो. आतापर्यंत त्याने चार जिल्ह्यांतील १२ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केले आहेत. अजूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. लवकरात लवकर त्याच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याची माहिती देणार्‍या व्यक्तीला पोलिसांकडून रोख रकमेचे बक्षीसही जाहीर करण्यात येणार आहे.

हा नराधम अतिशय विकृत आहे. तो परिसरात फिरून ९ ते १२ या वयोगटातील सावज हेरतो. घरी कोण नसलेली अल्पवयीन मुलगी दिसली की तो तिच्याकडे जातो. ‘तुझ्या वडिलांनी पार्सल किंवा सामान घ्यायला बोलावले आहे, ते घेण्यासाठी चल’, असे तो अल्पवयीन मुलीला सांगतो. त्यानंतर त्या मुलीला पडक्या इमारतीत अथवा निर्जन ठिकाणी नेतो. अंगावर किडा पडला आहे, तो चावला तर कॅन्सर होईल, असे सांगून तो अल्पवयीन मुलीला कपडे काढण्यास भाग पाडतो. त्यानंतर चाकूच्या धाकाने त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करतो. आतापर्यंत अशा १० ते १२ घटना नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात घडल्या आहेत. प्रत्येक घटनेत हाच आरोप आहे. पीडित मुलींनी केलेल्या वर्णनावरून हा नराधम माथेफिरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र त्याला पकडण्यात चारही जिल्ह्यांतील पोलिसांना यश आलेले नाही.

- Advertisement -

नालासोपारातील तुळींज पोलीस ठाणाच्या हद्दीत याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. त्यावेळी एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसला. मात्र त्याची माहिती अद्याप कोणीही देऊ शकलेलो नाही. पोलिसांनी त्याचे छायाचित्र कसेबसे मिळवले आहे. लवकरच त्याचे होर्डिंग प्रकाशित करण्यात येणार आहे. या नराधमाबद्दल माहिती देणार्‍यांना पोलिसांकडून रोख रकमेचे बक्षीसही दिले जाणार असल्याचे सुत्रांकडून कळते. तसेच माहिती देणार्‍याचे नावही गुपित ठेवण्यात येणार आहे

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमावर एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबईत ४, ठाणे ग्रामीण आणि शहर मिळून ५ , मुंबईत २ आणि पालघरमध्ये तुळींज पोलिस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे.

- Advertisement -

विकृत तरुणाचे सीसीटीव्ही फुटेजवरून छायाचित्र मिळाले असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. या तरुणाची गुन्हा करण्याची पद्धत पालकांनी आपल्या पाल्यांना सांगून त्यांना सावध करावे तसेच स्वतःही सतर्क रहावे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे. – सुदर्शन पोतदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तुळींज.

हा तरूण विकृत आणि सराईत आहे. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही त्याने असा प्रकार केला. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी त्याच्या फोटोचे होर्डिंग्ज लावून नागरिकांना सावध करणार आहोत. – गौरव सिंग, पोलीस अधीक्षक, पालघर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -