घरमुंबईठाणेकरांना पार्किंगसाठी दोन वाहनतळांची निर्मिती

ठाणेकरांना पार्किंगसाठी दोन वाहनतळांची निर्मिती

Subscribe

ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरातील नागरिकांकडे असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न ठाणेकरांना भेडसावत आहे. रस्त्यांचे रुंदीकरण झाले, मात्र त्यावर वाहने उभी राहिल्यामुळे पदचार्‍यांना चालायला जागाच नाही. स्टेशन परिसरातील मार्केटमध्ये दुकानदार आपल्या दुकानासमोर आपले वाहन उभे करत असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून ठामपाने दोन मोठ्या वाहनतळांच्या निर्मितीची तयारी सुरू केली आहे.

ठाणे स्टेशनजवळ एसटी डेपोत भूमिगत वाहनतळ तयार केला जाणार आहे. या तळावर 800 चारचाकी वाहने उभी करण्याची सोय केली जाईल. या व्यतिरिक्त कळवा एसटी डेपो येथे दुसरा मोठा वाहनतळ तयार केला जाईल. जुने ठाणे महापालिका कार्यालय, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, झेडपी कार्यालय, आरोग्य विभाग, कन्या शाळा येथील वाहनांसाठी सोयीचा म्हणून स्टेशनजवळ मोठा भूमिगत वाहनतळ तयार केला जाईल. हा 18 हजार चौरस मीटर परिसर असलेला भूमिगत वाहनतळ असेल.

- Advertisement -

कळव्यात एसटी दुरुस्तीसाठी एक 4500 चौरसमीटरचा डेपो तयार करण्यात आला आहे. या डेपोच्या प्रदीर्घ काळापासून पडून असलेल्या जागेचा वापर करुन दुसरे वाहनतळ तयार केले जाईल. गावदेवी भाजी मंडईच्या ठिकाणी तसेच रेल्वे स्टेशन परिसर येथे आधीच दुचाकींसाठी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. गावदेवी मैदानाखाली भूमिगत पार्किंग प्लाझा सुरू करण्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे. पण वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे दोन मोठे वाहनतळ तयार केले जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -