घरमुंबईBreaking : मुंबई पोलीस दलातील २ पोलिसांना अटक!

Breaking : मुंबई पोलीस दलातील २ पोलिसांना अटक!

Subscribe

अटक करण्यात आलेले दोन्ही पोलीस कर्मचारी मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत काम करत होते.

एका लॉटरी विक्रेत्याचे अपहरण करून त्याच्याजवळून जबरीने पैसे काढून घेणाऱ्या, मुंबई पोलीस दलातील दोन पोलिसांविरुद्ध काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनाही अटक करण्यात आली असून, शुक्रवारी रात्री ही कारवाई पार पडली. अटक करण्यात आलेले दोन्ही पोलीस कर्मचारी मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत काम करत होते. रामकृष्ण जाधव (५७) आणि अविनाश अंधारे (५४) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नवे असून, या गुन्ह्यातील खाजगी इसम हा फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. रामकृष्ण जाधव हा पोलीस उपनिरीक्षक असून अविनाश अंधारे हा पोलीस हवालदार आहे. मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखा १ मध्ये दोघे कार्यरत असून दोघे नवी मुंबई येथे राहणारे आहेत. मानखुर्दच्या लल्लुभाई कंपाऊंड येथे राहणारा पोलीस खबरी वसीम पठाण हा रामकृष्ण आणि अविनाश यांच्या संपर्कात होता. काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम बेकायदेशीररीत्या ऑनलाईन लॉटरी सेंटर चालवत असल्याची माहिती वसीम याने रामकृष्ण आणि अविनाश यांना दिली होती.

 प्रकरण सविस्तर

या लॉटरी विक्रेत्याकडून मोठी तोडपाणी होईल असे वशिमने सांगितले. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी रामकृष्ण आणि अविनाश हे दोघे सध्या वेषातच पोलीस लिहलेले वाहन घेऊन काळाचौकी पोलीस ठाण्याचा हद्दीतील कॉटनग्रीन या ठिकाणी असलेल्या लॉटरी सेंटरवर आले. त्यांनी लॉटरी विक्रेत्याला पोलीस असल्याचे सांगून त्याला पोलीस वाहनात बसवून बलॉर्ड पियर येथे आणून त्याच्याकडील १० हजार रुपयाची रोकड काढून त्याला आणखी दहा हजार रुपये एटीएम सेंटर मधून काढण्यास भाग पाडले. या दोघांनी लॉटरी विक्रेत्याकडून जबरीने २० हजार रुई घेऊन त्याला बलॉर्ड पियर येथे सोडून तेथून पोबारा केला.

- Advertisement -

हा प्रकार संशयित वाटल्याने या लॉटरी विक्रेत्याने दुसऱ्या दिवशी काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.काळाचौकी पोलिसांनी रामकृष्ण जाधव (५७) आणि अविनाश अंधारे (५४) आणि पोलीस खबरी वसीम पठाण या तिघाविरुद्ध अपहरण, जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री दोघांना नवीमुंबईतील कोपरखैराणे आणि कामोठे येथून अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -