घरमुंबईनिमंत्रण स्वीकारलं; उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे येणार

निमंत्रण स्वीकारलं; उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला राज ठाकरे येणार

Subscribe

राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहणार

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरूवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. आज शिवाजी पार्कवर अर्थात शिवतीर्थावर शपथविधी सोहळा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज होणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन केला. या फोनवरून राज ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण दिले आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी यांनी दिलेल्या निमंत्रणाला त्वरीत उत्तर दिले नव्हते. त्यामुळे राज ठाकरे आपली या शपथविधीला उपस्थिती दर्शवतात की नाही, या याबाबत अस्पष्टता होती. त्यामुळे राज ठाकरे या शपथविधीला हजर राहणार की नाही? याची सर्वांनाच प्रतिक्षा होती. मात्र आता ही प्रतिक्षा संपली आहे, कारण राज ठाकरे या शपथविधीला हजेरी लावणार आहेत.

ठाकरे कुटुंबातील पहिला मुख्यमंत्री

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष २००५ साली सोडला. यानंतर २००६ ला राज ठाकरेंनी स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांमध्ये राजकीय वादाची धुसफूस सुरू असल्याचे दिसते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जरी राजकीय पातळीवर वाद-विवाद, मतभेद असले तरी कौटुंबिक पातळीवर अनेकदा हे दोघं एकमेकांच्या मदतीसाठी हजर असतात. तसेच ठाकरे कुटुंबातील पहिला मुख्यमंत्री हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहे. आज गुरूवारी शिवतीर्थावर होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यात ६ वाजून ४० मिनिटांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या आनंदाच्या क्षणी राज उपस्थितीत राहणार!

राज ठाकरे यांचा कृष्णकुंज हा बंगला शिवतीर्थाशेजारीच असल्याने राज हे त्यांच्या कुटुंबियांसह या उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्याची अधिक शक्यता वर्तवण्यात येत होती आणि ही शक्यता अखेर खरी ठरली. त्यामुळे या ठाकरे कुटुंबातील ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला तसेच उद्धव ठाकरेंच्या या आनंदाच्या क्षणी राज उपस्थितीत राहणार आहे.


LIVE : आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी शिवाजी पार्क सज्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -