घरमुंबईमुख्यमंत्र्यांकडून कोलई जमीन व्यवहारात निवडणुक प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकीची ? किरीट सोमय्यांचा सवाल

मुख्यमंत्र्यांकडून कोलई जमीन व्यवहारात निवडणुक प्रतिज्ञापत्रातील माहिती चुकीची ? किरीट सोमय्यांचा सवाल

Subscribe

कोलाईच्या मालमत्तेची खरी किंमत किती ? पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांनी केला प्रश्नांचा भडीमार

अन्वय नाईक यांच्या कोलईच्या जागेची किंमत किती आणि आपण किती रूपयांमध्ये घेतली ? असा सवाल भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. आपण जे खरेदीखत केले त्यातुलनेत जमीनीचे बाजारमूल्य अधिक असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले होते. जवळपास १० कोटी रूपयांची जागा ही अवघ्या २ कोटी १० लाखात खरेदी करण्यात आली. विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रातही ही जागा ४ कोटींना खरेदी केल्याचा उल्लेख आहे. या प्रकरणात खर काय आहे ? असा सवाल किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

- Advertisement -

रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने कोर्लई गावात अन्वय नाईक यांच्याकडून 30 जमिनी या 29 एप्रिल 2014 मध्ये घेण्यात आल्या. या जमिनीचे करार ग्रामपंचायत मध्ये केलेले अर्ज, रजिस्ट्रेशन, त्याच्यावरील 19 बंगले या संबंधीच्या घरपट्टया, ठाकरे आणि वायकर परिवाराद्वारा करण्यात आलेल्या कराराच्या प्रती आमच्याकडे उपलब्ध आहेत. तब्बल 10 कोटीची मालमत्ता 2.1 कोटी रुपयात खरेदी व्यवहार झाला. अन्वय नाईक यांच्याकडे 2004 पासून कोर्लई गावात 30हून अधिक जमिनी होत्या. 2009 मध्ये या जमिनीवर 19 घरे ग्रामपंचायत, सरकारी परवानग्या घेऊन श्री. अन्वय नाईक यांनी बांधल्या. एकंदरीत 23,500 चौ.फू. बांधकाम करण्यात आले. सन 2009 पासून 2021 पर्यंतची या 19 बंगल्यावरील घरपट्टी, पाणीपट्टी व वीजकर ग्रामपंचायतीकडे भरण्यात आली आहे. 31 मार्च 2014 पर्यंत अन्वय नाईक हे भरत होते. 1 एप्रिल 2014 पासून 31 मार्च 2021 पर्यंतची घरपट्टी, पाणीपट्टी व वीजकर सौ. रश्मी उद्धव ठाकरे आणि सौ. मनिषा रविंद्र वायकर यांनी भरले आहे, अशीही माहिती सोमय्या यांनी दिली. त्यानंतर 29 एप्रिल 2014 रोजी ठाकरे परिवार व अन्वय नाईक यांच्यामध्ये करार झाला. 30 एप्रिल 2014 रोजी त्याचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले असल्याचा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -