घरमुंबईलोकांची फसवणूक करणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात!

लोकांची फसवणूक करणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात!

Subscribe

नामांकित कंपनीची प्रतिनिधी असल्याचे भासवून विजयसिंग नावाच्या भामट्याने मुंबई मध्ये 3 जणांची तब्बल 90 लाख रुपयांची फसवणूक केली होती. उल्हासनगर गुन्हे शाखा घटकचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय पालांडे व पोलीस पथकाने सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला पोलिसांनी पार्क साईट पोलीस मुंबई यांच्या स्वाधीन केले आहे

२०१६ ते २०१८ च्या दरम्यान मुंबईच्या पार्क साईट पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीतील फ्लॅट बुकींगच्या नावाखाली विजयसिंग या भामट्याने ३ इसमांकडून जवळपास ९० लाख ४१ हजार रूपयाची रक्कम चेकद्वारे घेतली होती. मात्र अनेक वर्षे उलटून गेली तरी त्या इसमांना घरे मिळाली नाहीत आणि आरोपी विजयसिंग फोनवर उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला होता.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैशाची गुंतवणूक करणाऱ्या या इसमांनी पार्क साईट, विक्रोळी ( मुंबई ) पोलिस ठाण्यात विजय सिंग याच्याविरूध्द तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

- Advertisement -

पैशांचा अपहार करून आरोपी विजयसिंग हा मुंबई व ठाण्यातील विविध ठिकाणी लपत होता. दरम्यान उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत उसाटणे चौकीजवळील निसर्ग हॉटेल या ठिकाणी काल दुपारी आरोपी विजयसिंग येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखा घटक – ४ चे ए.एस.आय.उदय पालांडे यांना मिळाली होती.

पालांडे यांनी ४ वर्षात पाहिजे असलेले व न्यायालयाने फरार घोषित केलेले जवळपास ४३१ आरोपींना पकडण्याची धडाकेबाज कामगिरी केली असून अशी कामगिरी करणारे ते महाराष्ट्रातील  एकमेव पोलिस कर्मचारी आहेत.गुन्हे घटक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलिस निरिक्षक मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विश्वास माने, विठ्ठल पदमीरे , महेश पाटील, दादासाहेब भोसले, महिला पोलीस कॉन्स्टेबल माया तायडे यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचून विजय सिंग याला ताब्यात घेतले. त्याच्याबाबत पार्क साईट पोलिसांना माहिती देऊन आरोपी विजयसिंग याला त्यांच्या स्वाधीन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -