घरमुंबईगणेशोत्सव मंडळांना पावसाचा फटका

गणेशोत्सव मंडळांना पावसाचा फटका

Subscribe

मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील गणेश मंडळांनाही बसला. पूर्व उपनगरातील सार्वजनिक उत्सव समिती १ चा विक्रोळीचा विकारहर्ता मंडळाच्या गणपती मंडपाच्या आवारात गुडघाभर पाणी साचले.

सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फटका गणेशोत्सव मंडळांना बसला आहे. पूर्व उपनगरातील सार्वजनिक उत्सव समिती १ चा विक्रोळीचा विकारहर्ता मंडळाला बुधवारी पावसाचा फटका बसला. मंडपाच्या आवारात गुडघाभर पाणी साचल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजन पडले. मात्र कार्यकर्त्यांनी धावपळ करत मंडपातील सामान उचलल्याने फारसे नुकसान झाले नाही. पूर्व उपनगरातील सार्वजनिक उत्सव समिती १ चा ‘विक्रोळीचा विकारहर्ता’ गणरायाच्या मंडपात सकाळी ८ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी विद्युत प्रवाह बंद करत सर्व सामान हलवल्याने फारसे नुकसान झाले नाही. मंडपामध्ये शिरलेले पाणी दुपारी ३ वाजेपर्यंत होते. पण त्यानंतर खाडीला ओहोटी लागल्याने पाणी ओसरल्याची माहिती सार्वजनिक उत्सव समिती १ चे कार्याध्यक्ष सुधीर गावडे यांनी दिली.

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

दरम्यान, मुसळदार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण झाली. याशिवाय सायन, माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. चाकरमाण्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. याशिवाय पश्चिम आणि हार्बर रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झाली. कसारा, कर्जत येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या ठाणे रेल्वे स्थानकापुढे जाऊ शकल्या नाहीत. याशिवाय कल्याण रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या अडवण्यात आल्या. यासोबतच गणेश मंडळांनी वीज प्रवाह बंद ठेवावेत असे आवाहन सार्वजनिक गणोशोत्सव समन्वय समितीने केले. मुंबईसह पुण्यातही पावसाचा जोर कायम होता. पावसाचा जोर पाहता खडकवासला धरणातून २२ हजार ८८० क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. याशिवाय मुंबई महापालिकेने देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Rain Live Update : पालिकेकडून नागरिकांना घरीच राहण्याचं आवाहन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -