घरमुंबई'मेरी माटी, मेरा देश' अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार

‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाअंतर्गत 13 ते 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार

Subscribe

मुंबई | ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Mati Mera Desh) अभियानाचा शुभारंभ सोहळा 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मागील वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या अभियानाची सांगता ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानाने होणार आहे. यानिमित्ताने मुंबई महापालिकेतर्फे मुंबईत 9 ते 14 ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये मुंबईकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. तसेच यंदा देखील 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

दरम्यान, ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाचा शुभारंभ सोहळा 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी शुक्रवारी मुंबई महापालिका मुख्यालयात पूर्वतयारीबाबत बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (दक्षता) डी. गंगाथरण, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगरे) राजेंद्र भोसले, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत, सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांच्यासह सर्व परिमंडळाचे सहआयुक्त/ उप आयुक्त तसेच पोलिस, बेस्ट आणि अन्य संबंधीत यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा – काय आहे ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियान?; नाशिक जिल्ह्यात ९ ऑगस्टपासून प्रारंभ

- Advertisement -

‘मेरी माटी मेरा देश’ अभियान

अभियान कालावधीत, पालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालय (वॉर्ड) स्तरावर पंच प्रण (शपथ), वसुधा वंदन, वीरांना वंदन, ध्वजवंदन आयोजन केले जाणार आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातील सर्व उपक्रमांमध्ये मुंबईकरांनी कृतीशील सहभाग घ्यावा. तसेच १३ ते १५ ऑगस्टदरम्यान सर्व मुंबईकरांनी ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रम अंतर्गत आपापल्या घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवावा, असे आवाहन देखील महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -