घरमुंबईआवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाज्या फेकल्या

आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी भाज्या फेकल्या

Subscribe

भाज्यांची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात भाज्या फेकून देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. आवक जास्त झाली असली तरी मालाला उठावच नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या भाज्यांची आवक प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी सोमवारी ५० टक्यांहून अधिक पालेभाज्या फेकून दिल्या. आवक जास्त झाली असली तरी मालाला उठावच नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कमी न होता वाढू लागले. त्यात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापेक्षा यावेळी भाज्यांची आवक वाढली. रविवारी नवी मुंबईचा घाऊक बाजार बंद असला तरीही त्यापूर्वी दोन दिवस, शुक्रवारी शनिवारी भाज्यांची आवकही चांगली झाली. या मालाला पावसामुळे चांगला उठाव मिळाला नसल्याने व्यापाऱ्यांकडे बराच भाजीपाला शिल्लक राहिला होता. त्यातच सोमवारी ६३८ गाड्यांची आवक झाल्याने मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या भाज्यांचे दर अजूनही खाली येतील, हे व्यापाऱ्यांच्या लक्षात आले होते.

पावसाचा भाज्यांवर परिणाम 

पावसाने दमदार हजेरी लावल्याने माल खराब होण्याची चिन्हे व्यापारी वर्गाला दिसू लागली. दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये न जाता जवळ असलेला माल चढ्या दरात विकला. त्यामुळे मार्केटमध्ये आवक कमी झाली की काय, अशी चर्चा किरकोळ बाजारात होऊ लागली. त्याचवेळी अगोदरचा शिल्लक माल आणि त्यात सोमवारी आलेला माल आवाक्यापेक्षा जास्त आल्याने भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी माल विक्रीची दुपारपर्यंत प्रतिक्षा केली. मात्र त्याला पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दुपारीनंतर तोच माल फेकून देण्याची वेळ व्यापाèयांवर आली.

शनिवारी बाजारात तब्बल ६५० गाड्यांची आवक झाली. भाजीपाला मोठ्या प्रमाणात बाजारात आल्याने ग्राहकांअभावी त्यातून काही माल शिल्लक राहिला. रविवारी मार्केट बंद असल्याने शिल्लक राहिलेला माल तसाच पडून राहिला.
रामदास पोवले, घाऊक व्यापारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -