घरमुंबईउत्साहाच्या भरात विनोद तावडेंची आचार्य अत्रेंवरच अप्रत्यक्ष टीका!

उत्साहाच्या भरात विनोद तावडेंची आचार्य अत्रेंवरच अप्रत्यक्ष टीका!

Subscribe

राज ठाकरे आणि मनसेवर टीका करण्याच्या नादात भाजप आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अप्रत्यक्षपणे थेट आचार्य अत्रेंवरच टीका केली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांच्या सभांची जोरदार चर्चा व्हायची त्या बुलंद तोफ मानल्या गेलेल्या आचार्य अत्रे यांच्यावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी झालेल्या भाषणात अप्रत्यक्षपणे टीका केली. राज ठाकरे यांच्या सभांवर टीका करताना भान हरवलेल्या तावडे यांना आपण आचार्य अत्रे यांच्यावर आपण अप्रत्यक्षपणे टीका करतोय याचे भानच राहिले नाही.

नेमकं तावडे काय म्हणाले?

वांद्रे येथील विजय संकल्प सभेमध्ये राज ठाकरे यांच्या टीका करताना तावडे यांनी थेट आचार्य अत्रे यांच्या त्यावेळच्या सभांचा दाखला दिला. यावेळी बोलताना तावडे म्हणाले, ‘आचार्य अत्रेंच्या सभेला नेहमी गर्दी व्हायची. पण त्यावेळी जिंकायची काँग्रेसच. त्यावेळी अत्रेंच्या भाषणामुळे लोकांची करमणूक व्हायची’. एकीकडे राज ठाकरेंच्या सभांना होणारी गर्दी, त्यातून होणारा काँग्रेसला फायदा आणि राज ठाकरेंच्या सभेमुळे लोकांची करमणूक होत असल्याचे केले जाणारे दावे, या पार्श्वभूमीवर विनोद तावडेंनी राज ठाकरेंची तुलना थेट आचार्य अत्रेंशी केल्याचं समोर आलं आहे. सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ यामुळे भाजपाची झोप उडाली असून, भाजपाचे नेते सध्या राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. ‘राज ठाकरे गावागावात सिनेमा दाखवत फिरत असतात. मात्र आता आम्ही ‘बघा रे व्हिडिओ’, हे दाखवून त्यांना उघडे पडणार’, असल्याचे विनोद तावडे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीला प्रश्न विचारण्याची लाज वाटते – विनोद तावडे

‘नेता लुख्खा वाटत असेल संजय निरुपला मत द्या’

दरम्यान, यावेळी विनोद तावडेंनी संजय निरूपम यांच्यावरही ‘लुख्खा’ या शब्दावरून टीका केली. ‘ज्या संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांना लुख्खा म्हटलं, त्या निरुपम यांना मनसेचे कार्यकर्ते कसे मतदान करतील?’ असा सवाल उपस्थित करत ‘तुम्हाला जर तुमचा नेता लुख्खा वाटत असेल तर निरुपमला मत द्या’, असे तावडेंनी सांगत मनसेला डिवचले आहे. आता तावडेंच्या या टिकेला मनसे कसं उत्तर देणार? यावर चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -