घरदेश-विदेशWarmest September : 2023 सर्वात उष्ण वर्ष ठरणार? सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक...

Warmest September : 2023 सर्वात उष्ण वर्ष ठरणार? सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद

Subscribe

नवी दिल्ली : ग्लोबल वार्मिंगमुळे दिवसेंदिवस वाढते तापमान नवनवे विक्रम प्रस्तापित करत आहे. युरोपियन युनियनच्या कोपर्निकस हवामान बदल एजन्सीने 5 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्या अहवालात म्हटले आहे की, विक्रमी उन्हाळ्यानंतर सप्टेंबरमध्ये असामान्यपणे उबदार हवामान कायम राहिले आहे. या महिन्यात उष्ण हवामानाने वर्षाच्या सामान्य तापमानापेक्षा नवीन उच्चांक स्थापित केला. (Warmest September Will 2023 be the warmest year Highest temperature ever recorded in the month of September)

युरोपियन युनियनच्या कोपर्निकस हवामान बदल सेवेनुसार, सलग चौथ्या महिन्यात इतिहासातील सर्वात उष्ण महिन्याचा विक्रम नोंदवला गेला. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या डेटावरून असे दिसून आले की, सप्टेंबरने 2020 मध्ये स्थापित केलेल्या मागील मासिक विक्रमाला 0.5 अंश सेल्सिअसने मागे टाकले असल्याचे सीएनएनने म्हटले आहे. कोपर्निकसने 1940 पासून उष्ण हवामानाच्या विक्रमांची नोंद ठेवण्यास सुरूवात केली. तेव्हापासून आतापर्यंत सप्टेंबर महिना इतका विलक्षण उबदार कधीच आला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai News : महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रस्ताव वर्षभरापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत

विक्रमी उन्हाळ्यानंतर, सप्टेंबर महिना वर्षभरातील अभूतपूर्व तापमानाने विलक्षण प्रमाणात विक्रम मोडला आहे. कोपर्निकसच्या उपसंचालक समंथा बर्गेस यांनी एका निवेदनात म्हटले की, सप्टेंबरमध्ये सरासरी जागतिक हवेचे तापमान 16.38 अंश सेल्सिअस होते. हा महिना 1991 ते 2020 पर्यंतच्या सरासरीपेक्षा 0.93 अंश सेल्सिअस जास्त उष्ण होता. औद्योगिक युगाच्या आधी, जेव्हा जगाने मोठ्या प्रमाणात जीवाश्म इंधने जाळण्यास सुरुवात केली तेव्हा सरासरी सप्टेंबरच्या तुलनेत ते 1.75 अंश सेल्सिअस जास्त आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये लिबिया आणि ग्रीस, बल्गेरिया आणि तुर्कीमध्ये विनाशकारी पूर आला ज्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – रुग्णालयातील मृत्यू तांडवानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर! नवीन वर्षापासून औषध खरेदी दर करारानुसार

सप्टेंबर महिन्याच्या इतिहासातील सर्वोच्च तापमान

दुसरीकडे, कॅनडा स्वतःच्या अभूतपूर्व जंगलातील आगीशी झुंज देत होता आणि दक्षिण अमेरिकेतील काही भाग विक्रमी उष्णतेने जळत होते. दरम्यान, विक्रमी पावसामुळे न्यूयॉर्कमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, सप्टेंबरमध्ये समुद्राच्या तापमानानेही विक्रम मोडला. समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान 20.92 अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे सप्टेंबरच्या इतिहासातील सर्वोच्च आणि यावर्षी ऑगस्टनंतरच्या कोणत्याही महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान आहे. अंटार्क्टिकमधील समुद्रातील बर्फ देखील वर्षाच्या या वेळेसाठी विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. या विक्रमी घटनांमुळे, यूएस नॅशनल ओशनिक अँड Atmospheric Administration 2023 हे रेकॉर्ड केलेल्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष असण्याची शक्यता 93 टक्क्यांहून अधिक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -