घरमुंबईपाणी द्या पाणी...

पाणी द्या पाणी…

Subscribe

महिलांचा ग्रामपंचायतीला घेराव

शहापूर तालुक्यातीलआसनगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ऐन उन्हाळ्यात पाण्याची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे. तालुक्यातील सर्वात मोठी पाणी योजना असलेल्या आसनगावमधे वाढते नागरीकरण पाहता गेली कित्येक वर्षे प्रत्येक प्रभागात दोन ते तीन दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित होत असल्याने या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत.

एकूण 6 वॉर्ड, 17 ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या आसनगावात रोज पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने परिणामी नाईलाजास्तव नागरिकांना पिण्यासाठी हवाबंद बाटलीचे पाणी विकत घ्यावे लागते आहे. यामुळे नागरिकांना अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आम्ही नियमितपणे दर महिन्याला पानीपट्टी भरतो तरीही पाण्यासाठी ग्रामपंचायतीकडून आमचे असे हाल का सुरू आहेत? असा संतप्त सवाल आता येथील नागरिक नगरपंचायतीला विचारू लागले आहेत. महिलांनी पाणीपुरवठ्याच्या या समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, या सर्व तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांचा आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून या पाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला असून, पाईपलाईन फुटणे, पंपिंग स्टेशनचा पंप जळणे, अशा कारणांमुळे पाणीपुरवठ्याची मोठी समस्या येथे निर्माण झाली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांमधे आसनगावच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा न झाल्यामुळे व ग्रामपंचायतीने पर्यायी कोणतीही पाण्याची व्यवस्था न केल्यामुळे संतापलेल्या आसनगावच्या महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनास धडक देत ग्रामसेवक पाटील यांना खंडित पाणीपुरवठ्याबाबत जाब विचारला. दरम्यान, प्रत्येक प्रभागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन यावेळी महिलांना देण्यात आल्यानंतर हे घेराव आंदोलन महिलांनी मागे घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -